(०२०) २६१३४८०६         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.

अं.क्र.योजनाकालावधीमाहिती 
1 उत्कृष्ट पशूधनाची उत्पत्ती करणे, दुध, मांस, अंडी, लोकर इत्यादीचे उत्पादनात वाढ करणे निरंक पहा
2 पशूसंवर्धनाकरिता नियमित उपचार, लसीकरण, कृत्रिमरेतन, बेरड वळूंचे खच्चीकरण करणे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणणेकरिता उपाययोजना करणे उदा. क्षारमिश्रण पुरवठा करणे निरंक पहा
3 प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ व श्रेणी-२ अंतर्गत एक दत्तक गाव घेऊन तेथील पशुधनाचे उत्पादन वाढवणे कामधेनू दत्तक ग्राम योजना :- सन 2013-14 च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कामधूनू दत्तक ग्राम योजना मंजूर आहे. सदरची योजना नविन योजना असून पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत असलेल्या एकूण 73 पशुवैद्यकिय संस्थांमार्फत प्रत्येकी एक गाव दत्तक घेवून सदर गावामध्ये योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता रु.111.32 लक्ष तरतूद करणेत आली आहे. या योजनेअंतर्गत जनावरांना जंतनाशक औषधी पाजणे,गोचिड गोमाशा निर्मूलन कार्यक्रम, निकृष्ट चारा सकस करण्यासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन ,दुग्ध स्पर्धांचे आयोजन, लसीकरण शिबीरे, वंध्यत्व निवारण शिबीरे, रक्तजल व रोग नमूने इ. कार्यक्रम एकत्रित रित्या दत्तक गावामध्ये मोहिम स्वरुपात राबविणेत येणार आहेत पहा
4 एकात्मिक कुक्कुट विकास योजना :-१०० एकदिवशीय पिल्लांचे ५०% अनुदानावर वाटप 1. सदर योजनेचा लाभ सर्व गटातील लाभार्थी घेवू शकतील. 2. मात्र एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेणेस पात्र असेल. 3. 30 टक्के महिला लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल. 4. लाभधारकांची निवड जिल्हा निवड समितीमार्फत करणेत येईल. 5.दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भूमिहिन शेतमजूर, मागासवर्गीय अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येईल. अर्जासोबत संबधित ग्रामपंचायतीची शिफारस जोडणे बंधनकारक राहील. 5)लाभार्थीकडे सदर योजना राबविणेसाठी दुभती/भाकड जनावरे असणे आवश्यक आहे. पहा
5 कृत्रिम रेतनाचे महत्त्व पटवून दुग्धस्पर्धा, वासरांचे मेळावे भरविणे, शेतकऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विषयक व्यवसायाची आवड निर्माण करणे. निरंक पहा
6 शेतकऱ्यांची सहल आयोजित करून त्यांना विविध ठिकाणच्या उत्कृष्ट आधुनिक तंत्रज्ञानाची व पशुपालनाची माहिती अवगत करणे निरंक पहा
7 वर्षभर पशुधनास हिरवा चारा उपलब्ध करून देणे जयवंत /यशवंत जातीचे ठोंब/ मका बियाणे पुरविणे विभागाच्या योजना, तांत्रिक बाबी, नवीन संशोधन, नवीन रोग इत्यादीबाबत प्रचारप्रसिद्धी करणे. निरंक पहा
8 शेळीपालनातून उत्कृष्ट शेळीपैदास करणे. परसातील कोबडयाचे संगोपन करून घरगुती कुक्कुटपालन व्यवसायास चालना देणे, गायी, म्हैस, शेळी, वराह, कुक्कुट इत्यादीच्या उत्कृष्ट प्रजननक्षम अनुवांशीक प्रजातीची उत्पत्ती करणे निरंक पहा
9 रबर मॅट पुरवठा करणे 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्र सत्यप्रत 5. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 6. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 7. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 8. रेशनकार्ड 9. बँकेचे पासबुक झेरॉक्स पहा
10 50 टक्के अनुदानावर परसातील कुक्कुटपालनांस चालना देणेसाठी लाभधारकांना 50 एकदिवशीय पिल्ले व खाद्य पुरवठा करणे 1.विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्र सत्यप्रत 5. रहिवासी दाखला 6. अपत्य दाखला (स्वयंघोषणापत्र) 7. रेशनकार्ड 8. दारिद्र्य रेषेखाली/ दिव्यांग असल्यास दाखला 9. कुक्कुट पालन प्रशिक्षण झाले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत 10. मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला 11. बचत गटाचे सदस्य असल्याबाबत दाखला. (अध्यक्ष बचतगट) 12. बँकेचे पासबुक झेरॉक्स पहा
11 लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर शेळीगट (5+1) वाटप करणे 1. आधारकार्ड सत्यप्रत. 2. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 3. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 4. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 5. रेशनकार्ड. 6. बंधपत्र. (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमून्यात) 7. 7/12 उतारा (7/12 वर नाव नसलेस नावे असणाऱ्यांचे संमतीपत्र) पहा
12 देशी/ सुधारीत गाई, म्हशी व पारडयांचा पुरवठा 50 टक्के अनुदान 1. आधारकार्ड सत्यप्रत. 2. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 3. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 4. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 5. रेशनकार्ड. 6. बंधपत्र. (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमून्यात) 7. 7/12 उतारा (7/12 वर नाव नसलेस नावे असणाऱ्यांचे संमतीपत्र) पहा
13 जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करणे (वैरण विकास योजना) 1. संकरीत देशी कालवडी / सुधारीत पारड्यांना पशुखाद्य वाटप ( 50 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्र सत्यप्रत 5. अपत्य दाखला (स्वयंघोषणापत्र) 6. रेशनकार्ड 7. सरपंच शिफारस 8. बँकेचे पासबुक झेरॉक्स 2. वैरण बियाणे व चारा वाटप कागदपत्रे ( 100 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. फोटो ओळखपत्र (आधारकार्ड) सत्यप्रत 3. पशुधन असल्याबाबत संस्थाप्रमुखाचा दाखला 4. रेशनकार्ड 5. सातबारा (7/12) उतारा. पहा
14 विशेष घटक योजनेअंतर्गत अनु.जातीच्या कुटुंबांना शेळ्या मेंढ्यांच्या गटाचे वाटप करणे (75 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्राची (आधारकार्ड)सत्यप्रत 5.अपत्य दाखला. (स्वयंघोषणापत्र) 6. रेशनकार्ड 7.दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला 8. 7/12 व 8 - अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8 9. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत 10. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत 11.बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र. 12. रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत. 13. बँकेचे पासबुक झेरॉक्स पहा
15 विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवशीय प्रशिक्षण देणे. 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्राची (आधारकार्ड) सत्यप्रत 5.रहिवाशी दाखला (स्वयंघोषणापत्र) 6. अपत्य दाखला. (स्वयंघोषणापत्र) 7. रेशनकार्ड 8. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत 9.गामसेवक व सरपंच यांचेतर्फे ग्रामपंचायत शिफारस पत्र. पहा
16 विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे (75 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्राची (आधारकार्ड)सत्यप्रत 5.अपत्य दाखला. (स्वयंघोषणापत्र) 6. रेशनकार्ड 7.दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला 8. 7/12 व 8 - अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8 9. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत 10. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत 11.बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र. 12. रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत. 13. बँकेचे पासबुक झेरॉक्स पहा
17 दर पाच वर्षांनी पशुधनाची गणना करून पशुधनाची वाढ / घट याबाबत अभ्यास करून वेगवेगळ्या योजनांचे नियोजन करणे निरंक पहा
18 विविध योजना राबविणे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करून उत्कृष्ट प्रकारच्या पशुधनास वाढ करणेस पशुपालकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे निरंक पहा
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 पशुसंवर्धन विभागाच्या योजनापशुसंवर्धन विभागामार्फत कोणत्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात?पशुसंवर्धन विभागामार्फत कोणत्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात? 1. देशी/ सुधारीत गाई, म्हशी व पारडयांचा दुधाळ जनावराचा पुरवठा 50 टक्के अनुदानावर. 2. लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर शेळीगट (5+1) वाटप करणे. 3. 50 टक्के अनुदानावर परसातील कुक्कुटपालनांस चालना देणेसाठी लाभधारकांना 50 एकदिवशीय पिल्ले व खाद्य पुरवठा करणे 4. रबर मॅट पुरवठा करणे. 5. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजना :-१०० एकदिवशीय पिल्ले व खाद्य ५०% अनुदानावर वाटप करणे. 6. जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करणे (वैरण विकास योजना) 7. विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे (75 टक्के अनुदान) 8. विशेष घटक योजनेअंतर्गत अनु.जातीच्या कुटुंबांना शेळ्या मेंढ्यांच्या गटाचे वाटप करणे (75 टक्के अनुदान) 9. विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवशीय प्रशिक्षण देणे.
2 पशुसंवर्धन विभागाच्या योजनासदर योजनांसाठी कोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे?1. आधारकार्ड सत्यप्रत. 2. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 3. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 4. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 5. रेशनकार्ड. 6. बंधपत्र. (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमून्यात) 7. 7/12 उतारा (7/12 वर नाव नसलेस नावे असणाऱ्यांचे संमतीपत्र)
3 पशुसंवर्धन विभागाच्या योजनायोजनांच्या अधिक माहितीसाठी कोणाकडे संपर्क साधावा?संबंधित पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1/2 किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती
4 पशुसंवर्धन विभागाच्या योजनागाई/म्हशींचे सर्वसाधारण रोग कोणते ?गाई /म्हशीमध्ये घटसर्प,फरया ,पायलाग हे महत्त्वाचे रोग आहेत.
5 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाशेळ्या मेंढयामधील सर्वसाधारण रोग कोणते ?आंनंविषार,पायलाग,बुळकांडी ,पिपीआर.
6 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाजनावरांमध्ये रोग प्रतिकारक लसीकरणासाठी कोणाशी संपर्क साधावा ?गावापासून जवळ असलेल्या कोणत्याही पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
7 पशुसंवर्धन विभागाच्या योजनादवाखान्याची वेळ काय?दवाखान्याची वेळ ऑक्टोबर ते जानेवारी सकाळी ८ ते १ ,दूपारी .३ ते ५ फ्रेबुवारी ते सप्टेंबर सकाळी ७ ते १२. दुपारी .४ ते ६ .
8 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाकोंबड्यामधील सर्वसाधारण रोग कोणते ?कोंबड्यामध्ये सर्वसाधारणपणे कोकणात प्रामुख्याने मानमोडी ,पांढरी हगवण ,देवी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो .
9 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाजनावरांच्या कृत्रिम रेतनासाठी फि आकारली जाते का ?किती ?होय. शासन निर्णयप्रमाणे दवाखान्यात जनावर आणल्यास शासनाने विहित केलेल्या दरान्वये रु .४०/- प्रति जनावर इतकी सेवाशुल्क आकारली जाते .
माहिती उपलब्ध नाही