पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण फार पुर्वीपासुन प्रचलीत आहे तसं पाहायला गेलं तर ही म्हण अगदी चपखल बसावी अशीच!
सुसंस्कृत, देखणे, दैदिप्यमान, संस्कृतीरक्षक पुणे!
मुळा मुठा नदीच्या किना.यावर वसलेले पुणे शहर भारतातील आठव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुस.या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
प्राचीन इतिहासात या शहराची पाळंमुळं जवळजवळ 2000 वर्षांपुर्वीची तारीख दाखवतात, जुन्नर तालुक्यातील कार्ला गुफांमध्ये आपल्याला ही तारीख आढळते.
त्यानंतर 13 व्या शतकापासुन ते 17 व्या शतकापर्यंत इस्लाम शासनकर्ते झाले.
17 व्या शतकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेर्तृत्वात मराठयांनी स्वतंत्र राज्याची पायाभरणी केली. पेशव्यांनी मराठा साम्राज्यावर राज्य केले, आपले साम्राज्य पुण्यासारख्या शहरात प्रस्थापीत केले आणि शहराचा कायापालट झाला.
पुढे 19 व्या शतकात इंग्रजांनी सत्ता काबीज केली आणि पुणे ब्रिटीश राजवटीचा भाग झाले.
अनेक राष्ट्रवादी आणि मराठी समाज सुधारकांनी आपापल्या कार्यकाळात अनेक समाज सुधारणेची कामे पुण्यापासुन सुरू केलीत.
फार प्राचीन इतिहास या शहराला लाभला असल्याने या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील मानले जाते.
पुण्यात आजही दिमाखात उभ्या असलेल्या प्राचीन ईमारतींच्या आठवणी आपल्या समृध्द आणि गौरवशाली भुतकाळाशी जोडल्या गेल्या आहेत.
शास्त्रीय संगीताच्या मैफिली, नाटक, साहित्य, क्रिडा, आध्यात्मिक सोहळे अश्या निरंतर चालत राहाणा.या हालचालींमुळे हे शहर ओळखलं जातं.
अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आज देखील दिमाखात या पुणे शहरात उभ्या आहेत आणि त्यामुळेच तर या शहराला विद्येचे माहेरघर देखील म्हंटले जाते.
लाखो युवकांचा लोंढा रोज शिक्षणाच्या निमीत्ताने, नौकरीच्या निमीत्ताने या पुण्याकडे येतो आणि त्यामुळे पाहाता पाहाता आज पुणं फार प्रचंड वेगानं विस्तारलयं!
संपुर्ण जगात प्रसिध्द असलेले पुणे विदयापीठ या शहरात आहे आणि अनेक नामांकित शिक्षणसंस्था येथे असल्याने या शहराला पुर्वेकडचे ऑक्सफोर्ड असे देखील म्हंटल्या जाते.
येथील पुणे फिल्म इन्स्टिटयुट फार प्रसिध्द आणि लोकप्रीय असल्याने देशभरातुन विदयार्थी या ठिकाणी चित्रपट माध्यमातील शिक्षण घेण्याकरता येथे येतात.
सार्वजनिक सुखसुविधांमुळे आणि विकासाचा चढता आलेख पाहाता मुंबई पाठोपाठ पुणे शहर अग्रेसर आहे.
या जिल्हयाच्या पश्चिमेला रायगड जिल्हा असुन दक्षिणेला सातारा जिल्हा आहे वायव्येला ठाणे आग्नेयेला सोलापुर आणि नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे.
पुणे जिल्हयाविषयी वैशिष्टयपुर्ण गोष्टी
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, क्र. 9 आणि क्र. 50 या जिल्हयातुन गेले आहेत.
पुण्यनगरी या नावावरून या शहराचे पुणे हे नामकरण झाले असावे असे मानले जाते तसच पुण्यक देखील या शहराला म्हणत असावे असे कित्येकांचे म्हणणे आहे.
समस्त विश्वाकरता ज्या विभुतीने पसायदान मागीतले अश्या संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी या पुणे जिल्हयात आळंदीला आहे.
संत तुकाराम महाराजांचा जन्म आणि त्यांची साधना त्यांचे जीवनकार्य या पुणे जिल्हयात संपन्न झाले.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांमुळे जणु एक पवित्र आणि सात्विक उर्जा या जिल्हयाच्या कणाकणात आणि नसानसांत सामावल्याचे जाणवते.
दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री.विठ्ठलाच्या दर्शनाकरता संत तुकारामांची आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी याच पुणे जिल्हयातील देहु.आळंदी येथुन लाखो वारक.यांसमवेत प्रस्थान करते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच जिल्हयातील शिवनेरी गडावरचा. याच पुण्यनगरीत बालपणी महाराजांना संस्कारांचे आणि पराक्रमाचे बाळकडु मिळाले.
पुणे जिल्हयात आणि आसपास छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आणि त्यांचा पराक्रम जवळुन पाहाणारे गड किल्ले आजही पहायला मिळतात.
पेशवाईमधे या पुण्याला राजधानीचा बहुमान मिळाला…. पेशवाईचे कर्तुत्व देखील या पुण्याने पाहीले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची कर्मभुमी आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या समाजपरीवर्तनाच्या कार्याला सुरूवात देखील येथुनच केली.
महर्षी धोंडो केशव कर्वे, रा.गो.भांडारकर, गोपाळ कृष्ण गोखले, सुधाकर आगरकर यांसारख्या थोर पुरूषांचे कर्तुत्व देखील या पुण्याने पाहिले.
पुणे जिल्हयातील भीमा ही मुख्य नदी आहे ही नदी आंबेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या पवर्तरांगांमधे भीमाशंकर येथुन उगम पावते.
तांदुळ आणि बाजरी या जिल्हयातील खरीपाची मुख्य पिकं म्हणुन ओळखली जातात, रबी पिकांमधे गहु आणि हरभरा महत्वाची पिकं आहेत दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी पिक होय.
भोर तालुक्यात आंबेमोहोर हा सुवासिक तांदुळ विशेष करून घेतला जातो त्याशिवाय मुळशी तालुका कमोद जातीच्या तांदळाकरता आणि जुन्नर जिरेसाळ तांदळाच्या जातीकरता फार प्रसिध्द आहे.
पुणे महाराष्ट्र आणि भारताचे एक महत्वपुर्ण औद्योगिक केंद्र देखील आहे, अनेक मोठमोठया आणि प्रसिध्द कंपन्यांनी आपले साम्राज्य या शहरात आणि आसपासच्या परिसरात पसरवले आहे.
पुणे निवासी नागरिकांना पुणेकर म्हणुन देखील संबोधण्याची प्रथा आहे येथे मुख्यतः मराठी हीच भाषा बोलली जाते त्याखालोखाल हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलणारे देखील आढळतात.
पुण्यातील आप्पा बळवंत चैक शैक्षणिक साहित्याकरता प्रसिध्द आहे,सर्व प्रकारची पुस्तकं मिळण्याकरता हा परिसर पुण्यात नावाजल्या गेला आहे.