अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| पाणी व स्वच्छता विभाग | नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये सामाजिक अंकेक्षण समितीचे कार्य कोणते ? | आर्थिक खर्चावर पर्यवेक्षण करणे. |
2
| पाणी व स्वच्छता विभाग | ठेकेदाराने काम पुर्ण केलेनंतर १ वर्षाने त्याने देखभाल दुरुस्ती करावी असे आहे. त्यामध्ये योजनेचे लाईट बील घेता येते का ? | नाही. |
3
| पाणी व स्वच्छता विभाग | नळ पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतीने करावी की ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समितीने करावी ? | ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समितीने करावी |
4
| पाणी व स्वच्छता विभाग | स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेमध्ये प्रोत्साहन अनुदान देण्याचे निकष कोणते | सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेमधील लाभार्थी BPL व APL मधील अनुसूचित जाती/ जमाती, लहान व सीमांत शेतकरी, भूमिहीन मजूर, शारीरिक दृष्ट्या अपंग, महिला कुटुंब प्रमुख यांना SBM-G – १२,०००/- शौचालयाचे बांधकाम पुर्ण करून त्याचे वैयक़्तिक लाभार्थ्यांसह शौचालयाचे फोटो पंचायत समितीमध्ये पुर्तता करणे. |
5
| पाणी व स्वच्छता विभाग | वैयक़्तिक शौचालय अनुदान मागणी प्रस्तावा संदर्भात चौकशी कुठे करायची ? | शौचालय बांधकाम झालेनंतर प्रस्ताव पंचायत समितीमध्ये आलेनंतर केंद्रशासनाच्या वेबसाईटवर शौचालय नसलेल्या यादीमध्ये लाभार्थ्यांचे नावे तपासली जातात. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये प्रस्ताव दिला जातो. जिल्हा परिषदेमध्ये अनुदान शिल्लक असेल तर लवकरात – लवकर अनुदान मिळते (१ ते २ महिने ) |
6
| पाणी व स्वच्छता विभाग | वैयक़्तिक शौचालय प्रस्तावासाठी लागणारे कागदपत्रे कोणती ? व ती प्रस्तावांसोबत कुठे सादर करावयाची ? | शौचालयं बांधकाम लाभार्थींसहीत फोटो व घराचा असेसमेंट उतारा / जागेचा ७/१२, व सदर कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर करावी. |
7
| पाणी व स्वच्छता विभाग | सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी किती अनुदान मिळते ? | स्वच्छ भारत मिशन (ग्रां ) मार्गदर्शक सुचनांनुसार दिनांक ०१.०४.२०१२ पासून सार्वजनिक शौचालयांना २.०० लाख रुपये प्रति युनिट देणेबाबत शासनाने निर्देशित केले आहे. गट स्तरावर वितरित करावयाची रक्कम केंद्र ६०% व राज्य ३०% अशी एकूण ९०% रक्कम रु. १,८०,०००/- जिल्हा स्तरावरून उपलब्ध करून दिली जाते व उर्वरित १०% रक्कम रु. २०,०००/- ग्रामपंचायतीने स्वतःच्या संसाधानातून, तेराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून किंवा राज्याद्वारे दिल्या जाणाऱ्या कोणत्याही निधीतून करणेची आहे. र. रु. २.०० लाख पैकी ९०% रक्कम रु. १,८०,०००/- इतकी रक्कम जिल्हास्तरावरून दिली जाते. |
8
| पाणी व स्वच्छता विभाग | सार्वजनिक शौचालय अनुदान मागणी प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? | • ग्रा.पं. मागणी पत्र ( लाभार्थी कुटुंब संख्या ----व आवश्यक युनिट ----नमुद केले आहे अगर कसे ) • ग्रामसभेचा ठराव नक्कल • ग्रा.पं.चा देखभाल दुरुस्तीचा दाखला. • पाण्याची सोय असलेबाबतचा दाखला. • मागणी केलेल्या स्वच्छतागृहात स्वच्छता राखणार असलेबाबतचा दाखला • सार्वजनिक शौचालय ज्या ठिकाणी बांधावयाचे आहे त्या जागेचा सातबारा. • सातबारामध्ये नमूद भोगवाटदारांचे तहसिलदार यांचे समक्ष १०० रु. च्या बाँडपेपर प्रतिज्ञा पत्र. • मंजुर अनुदानापेक्षा जादा येणारा खर्च करणेस ग्रामपंचायत तयार असलेबाबत दाखला • काम अन्य योजनेतून घेतलेले नसल्याचा दाखला • काम मुदतीत पूर्ण करण्याचे हमीपत्र • गट विकास अधिकारी यांचे शिफारस. |
9
| पाणी व स्वच्छता विभाग | राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव प्राप्त केलेनंतर पहिला, दुसरा व तिसरा हप्ता वितरित करताना हागणदारीमुक़्तीचे कोणते व किती टक्के ग्रामपंचायत हागणदारीमुक़्त (ODF) असणे आवश्यक ? | • शासन निर्णय २२ जानेवारी २०१४ नुसार • पहिला हप्ता :- शौचालय असलेल्या कुटुंब संख्येमध्ये २५% वाढ करणे अथवा एकूण कुटुंब संख्येचे ६०% हागणदारीमुक़्त असणे यापैकी जी कमी असेल ती. • हप्ता दुसरा :- ५०% किंवा ७०% हागणदारीमुक़्त असणे यापैकी जी कमी असेल ती • तृतीय हप्ता :- ७५% किंवा ८०% हागणदारीमुक़्त असणे यापैकी जी कमी असेल ती • अंतिम निधी वितरित करताना :- १०% अथवा ९०% हागणदारीमुक़्त असावी. |