अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| रोजगार हमी योजना | ग्रामीण यात्रास्थळ य योजनेंतर्गत कामे कशी मंजूर होतात ? | क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ यादीतील जागा उपलब्धता निधी व निकषांना अधीन राहून ग्रामपंचायत विभागाकडून मंजूर केली जातात. |
2
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामाची तरतूद मंजूर कधी होते ? | प्रशासकीय आदेशानंतर निकषानुसार पशुसंवर्धन विभागाकडून कामासाठी बांधकाम विभागाला तरतूद मंजूर होते. |
3
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामे मंजूर तरतूद | प्रशासकीय आदेशानंतर निकषानुसार कामासाठी बांधकाम विभागाला आरोग्य विभागामार्फत तरतूद मंजूर आहे. |
4
| रोजगार हमी योजना | ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या योजनेचा निधी कोठून प्राप्त होते ? | या योजनेचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून नियोजन विभागाकडून प्राप्त होतो. |
5
| रोजगार हमी योजना | क पर्यटन अंतर्गत निधी कोठून प्रप्त होता ? | क पर्यटन अंतर्गत निधी नियोजन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कडून प्राप्त होतो. जागा उपलब्धतेबाबतची कार्यवाही ग्रा.पं.कडून करणेत येते. |
6
| रोजगार हमी योजना | ग्रामीण यात्रास्थळ अंतर्गत कामांना निधी कोठून प्रप्त होतो ? | ग्रामीण यात्रास्थळ अंतर्गत कामांना निधी जिल्हा वार्षिक योजनेतून नियोजन विभागाकडून प्रप्त होतो. जागा उपलब्धतेबाबतची कार्यवाही ग्रा.पं.कडून करणेत येते. |
7
| रोजगार हमी योजना | ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या योजने अंतर्गत कोणती कामे मंजुरीसाठी घेतली जातात ? | या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेकडील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास योजना आराखड्यातील 2001-21 मधील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पीसीआय आधारे वर्गीकरण करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कोअर नेटवर्कच्या प्राधान्यक्रम यादीनुसार रस्त्यांची कामे मंजूर केली जातात. |
8
| रोजगार हमी योजना | ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेचा निधी मंजूर झालेवर खर्च करण्याची मुदत किती असते | ज्या आर्थिक वर्षात निधी मंजूर होतो त्यावर्षी व त्याच्या पुढील आर्थिक वर्ष अखेरपर्यंत निधी खर्च करणे बंधनकारक आहे त्यामुळे कामे मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहेत. |
9
| रोजगार हमी योजना | आमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजने अंतर्गत कोणत्या स्वरुपाची कामे हाती घेतली जातात ? | या योजने अंतर्गत मा. आमदार महोदयांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारित लहान स्वरूपांची लोकोपयोगी कामे हाई घेतली जातात.उदा.रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाह्य), पूल,मोरी व कॉजवे बांधकाम, सामाजिक व सांस्कृतिक सभागृह ,शाळा कंपौंड वॉल,समाजमंदिर .व्यायामशाळा ,स्मशानशेड ,सार्वजनिक शौचालय ,स्वच्छतागृह ,शाळा गृह बांधकामे,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय,खुला रंगमंच,सार्व.वाचनालय ,अंगणवाड्या,संरक्षक भिंती,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र बांधकामे,एस.ती पिकअप शेड इत्यादी स्वरुपाची कामे. |
10
| रोजगार हमी योजना | आमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत एखादे काम प्रस्तावित करणेसाठी कोणती कार्यवाही केली जाते ? | सर्वप्रथम मा.आमदार महोदय वरील पैकी आवश्यक कामांचीमागणी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे करतात. मा. जिल्हाधिकारी यांचेकडून कामांची छाननी करून त्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणेसाठी संबंधित विभागाकडे (जिल्हा परिषद / सार्वजनिक बांधकाम विभाग) सूचना दिली जाते. |
11
| रोजगार हमी योजना | आमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना कोणती कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे ? | या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना प्रथम सदर कामासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची कागदपत्रे उदा. 1) शासनाच्या मालकीची जागा असल्यास 7/12 उतारा. 2) रस्ता किंवा पायवाट असल्यास जागेचा नकाशा व रस्ते विकास योजनेत सदरचा रस्ता अंतर्भूत असल्यास त्याचा क्रमांक किंवा ग्रा.पं.चा 26 नं. उतारा,3) खाजगी मालकीची जागा असल्यास जागेचे बक्षीसपत्र व 7/12 उतारा व जागेचा नकाशा 4) प्रत्यक्ष कामाच्या जागेचा क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेला फोटो 5) सदरचे काम इतर योजनेत समाविष्ट नसलेबाबत तसेच काम पूर्ण झाले |
12
| रोजगार हमी योजना | आमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेचे प्रशासकीय मंजूरी व अनुदान | सक्षम अधिकाऱ्यांनी तांत्रिक मंजूरी दिलेले सविस्तर अंदाजपत्रक व आवश्यक कागदपत्रे यासह परिपूर्ण प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी यांजकडे प्रशासकीय मंजूरी व अनुदान प्राप्तीसाठी सादर करणेत येतो. |
13
| रोजगार हमी योजना | आमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेत मा.जिल्हाधिकरी यांजकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कोणती कार्यवाही केली जाते ? | सदर कामाच्या प्रस्तावास मा.जिल्हाधिकरी यांनी मंजूरी व 50 टक्के अनुदान दिल्यानंतर संबंधित विभागाकडून नियमानुसार निविदा निश्चिती करून मक्तेदारांना कामाचे आदेश दिले जातात. त्यानुसार कामाचे ठिकाणी संबंधित अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली काम सुरु करणेत येऊन पूर्ण केले जाते. काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे ठिकाणी कामाची माहिती दर्शविणारा फलक लावणेत येतो. |
14
| रोजगार हमी योजना | आमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेत काम पूर्ण झाल्यानंतर कोणती कार्यवाही केली जाते ? | काम पूर्ण झाल्यानंतर नावाचा फलक व पूर्ण झालेले काम स्पष्ट दिसेल अशा रीतीने काढलेला फोटो व काम पूर्णत्वाचा दाखला जोडनेत येऊन अनुदान मागणी मा.जिल्हाधिकरी यांजकडे केली जाते व अनुदान प्राप्त झाल्यानंतर सदरच्या अनुदानातून देयक खर्च टाकणेत येते व सदर पूर्ण झालेले काम देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरीत करणेत येते. |
15
| रोजगार हमी योजना | क वर्ग पर्यटन या योजनेंतर्गत कामे कशी मंजूर होतात ? | क वर्ग अंतर्गत मंजूर पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी व निकषांच्या अधीन राहून मंजूर आराखड्यातील कामे जागा शासकीय मालकीची उपलब्धता पाहून प्राधान्याने मंजूर केली जातात. नियोजन विभागाकडून कामे मंजूर होतात. |
16
| रोजगार हमी योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत कामे मंजूर कशी केली जातात ? | स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होणेसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेने सुचविलेली कामे पंचायत समितीने एकत्रित करून जि.प. स्तरावर पाठविली जातात. त्यानंतर जि.प. स्तरावर पूर्ण जिल्हाचा आराखडा तयार करून तस जि.प. च्या सर्वसाधरण सभेची मंजूरी घेऊन आराखडा मंजूर केला जातो. |
17
| रोजगार हमी योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना आराखड्यामध्ये कामे कोणत्या स्वरुपाची घेतली जातात ? | नियमित रस्ते , रस्ते खडीकरण ,शौचालय बांधकामे, गुरांसाठी गोठव बंधने, कुक्कुट पालन शेड, शेळी पालन शेड, वैयक्तिक स्तरावरील कामे इ. प्रस्तावित केली जातात. |
18
| रोजगार हमी योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची कामे केंव्हा सुरु केली जातात ? | नोंदणीकृत मजुरांची पुर्शी मागणी प्राप्त झालेनंतर कामे सुरु केली जातात. तसेच काम मंजूर झालेनंतर व ग्रामपंचायती मार्फत मजुरांची यादी प्राप्त झालेवर तसेच ग्राम पंचायतीकडून हजेरी पत्रक घेतलेनंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाते. |
19
| रोजगार हमी योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची मुल स्वरूपाच्या रस्त्यांची कामे हाती घेणेसाठी करावयाची कार्यपद्धती कशी आहे ? | रस्त्यांची कामे हाती घेणे पूर्वी रस्त्यासाठी जमीन उपलब्ध आहे अगर कसे याची खात्री केली जाते. जर जमीन खाजगी असल्यास त्यास संबंधित जमीन मालकाची संमती किंवा ग्रामपंचायत स्तरावर ब्क्शिस्प्त्राने जागा उपलब्धकेली जाते. |
20
| रोजगार हमी योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना मोठया प्रमाणात सदर योजना राबविण्यासाठी कोणती कार्यवाही करणेत येते ? | ग्रामपंचायत स्तरावर सदर योजनेचा प्रचार व प्रसिद्धी ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत केली जाते. |
21
| रोजगार हमी योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेत पेमेंट करावयाची कार्यपद्धती कशी आहे ? | हजेरी पत्रक हे एका आठवड्याचे असते त्यानंतर प्राप्त हजेरी पत्रकाची बाब्निहाय अभियंत्यांकडून मोजमापे घेऊन मस्टर गट विकास अधिकारी यांचेकडे पाठविला जातो. त्यानंतर गट विकास अधिकारी यांचेकडून मजुरांचे पेमेंट बँक / पोस्ट ऑफीसमध्ये जमा केले जाते. ग्रामपंचायतीमार्फत हजेरी पत्रक सांभाळण्यासाठी व त्यावर नोंदी कण्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांची नेमणूक ग्रामपंचायत पातळीवर करणेत येते. |
22
| रोजगार हमी योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेत कामावर मजूर म्हणून कोणाला घेता येते ? | ज्याचेकडे ग्रामपंचायत मार्फत जॉबकार्ड आहे व ज्याचे पोस्टात अथवा राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे त्या मजुरांना कामावर घेतले जाते. |
23
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामे यांचे अंदाजपत्रक तयार करणेची कार्यपद्धती कशी आहे ? | जिल्हा पशुसंवर्धन अधुकारी. जि.प. रत्नागिरी यांनी अंदाजपत्रके तयार करणे बाबत कळविल्यानंतर त्यानुसार उपअभियंता यांना सूचना देवून अंदाजपत्रके त्यांचेकडून तयार केली जातात. र.रु.5.00 लक्ष पर्यंत तांत्रिक मंजूरी उपअभियंता यांचेकडून दिली जाते व रु.5.00 लक्ष वरील कामांना कार्यकारी अभियंता यांचेकडून तांत्रिक मंजूरी दिली जाते. |
24
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामे मंजूर कशी केली जातात ? | अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजूरी देवून अंदाजपत्रके प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचेकडे पाठविली जातात.त्यानंतर त्यांचेकडून प्रस्तावित कामाला जागा उपलब्ध आहे अगर कसे याची खात्री करून त्याप्रमाणे शासन निकषानुसार प्रशासकीय मंजूरी दिली जाते. |
25
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामे केंव्हा सुरु केली जातात ? | प्रशासकीय मंजुरीचा आदेश पशुसंवर्धन अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेनंतर त्याची निविदा कार्यवाही करून कार्यारंभ आदेश देवून कामे सुरु होतात. |
26
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामाचे खर्च करण्याची कार्यपद्धती | निविदा झालेनंतर मक्तेदार उपअभियंता, शाखा अभियंता यांचे मार्गदर्शनानुसार काम पूर्ण करतात.शाखा अभियंता केलेल्या कामाचे मोजमापे घेऊन मोजमाप पुस्तकात नोंद करून मोजमाप पुस्तक व देयक विभागीय कार्यालयास सादर केले जातात.विभागीय स्तरावर तपासणी अंती वित्त विभागाकडून केलेल्या कामाचे मूल्यांकनानुसार धनादेश दिले जातात. |
27
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामाचे अंदाजपत्रक तयार करणेची कार्यपद्धती कशी आहे ? | जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. रत्नागिरी यांनी अंदाजपत्रके तयार करणे बाबत कळविल्यानंतर त्यानुसार उपअभियंता यांना सूचना देवून अंदाजपत्रके त्यांचेकडून तयार केली जातात. र.रु.5.00 लक्ष पर्यंत तांत्रिक मंजूरी उपअभियंतायांचेकडून दिली जाते व र.रु. 5.00 लक्ष वरील कामांना कार्यकारी अभियंता यांचेकडून तांत्रिक मंजूरी दिली जाते. |
28
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामे मंजूर कशी केली जातात ? | अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजूरी देवून अंदाजपत्रके प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठविली जातात.त्यानंतर त्यांचेकडून प्रस्तावित कामाला जागा उपलब्ध आहे अगर कसे याची खात्री करून त्याप्रमाणे शासन निकषानुसार प्रशासकीय मंजूरी दिली जाते. |
29
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामे केंव्हा सुरु केली जातात ? | प्रशासकीय मंजुरीचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेनंतर त्याची निविदा कार्यवाही करून कार्यारंभ आदेश देवून कामे सुरु होतात. |
30
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामाची खर्च करण्याची कार्यपद्धती | निविदा झालेनंतर मक्तेदार उपअभियंता , शाखा अभियंता यांचे मार्गदर्शनानुसार काम पूर्ण करतात.शाखा अभियंता केलेल्या कामाचे मोजमापे घेवून मोजमाप पुस्तकात नोंद करून मोजमाप पुस्तक विभागीय कार्यालयास सादर केले जातात.विभागीय स्तरावर तपासणी अंती वित्त विभागाकडून केलेल्या कामाचे मूल्यांकनानुसार धनादेश दिले जातात. |
31
| रोजगार हमी योजना | सर्व साधारण ठेकेदार यांचे करीता काय कागद पत्र आवश्यक आहेत? | वर्षात पुर्ण झालेली कामे 6) प्रगतीपथावरअसलेली कामे. 7) आयकर विवरण पत्रे दाखला पोच मागील तीन वर्षाचे,लेखापरिक्षीत नफा तोटा ताळेबंदासह. 8) विक्रीकर दाखला छायांकित प्रत. 9) व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र व अद्यावत चलने छायांकित प्रत. 10) नोंदणी शुल्क वर्गवारी प्रमाणे. 11) 100/-बॉंडपेपरवर नोटरी सक्षम शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी सेवेत नसल्याबाबत.तसेच ठेकेदारांच्या काळ्या यादीत नाव नसल्याबाबत.प्रतिज्ञा पत्र. |
32
| रोजगार हमी योजना | सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना ठेकेदार नोंदणी करीता कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत ? | 1) अर्हता प्राप्त केल्यापासून 10 वर्षाचे आत नमुन्यातील अर्ज सादर करणे. 2) पासपोर्ट आकाराचे 3 फोटो त्या पैकी एक फोटो राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेला असावा. 3) सिव्हील इंजिनियर डिप्लोमा डिग्री प्रमाणपत्राची छायांकित प्रत. 4) शेवटच्या वर्षाचे गुणपत्रकांची छायांकित प्रत. 5) रहिवासी दाखला. 6) एम्प्लॉयमेंट नोंदणी प्रमाणपत्रकाची छायांकित प्रत. 7) पतदारी प्रमाणपत्र शेड्यूल बँकेचे र.रु.300000/- 8) नोंदणी फी रक्कम रुपये 7500/- भरल्याचे चलन 9) 100/- रु. बॉंडपेपरवर नोटरी समक्ष प्रतिज्ञापत्र.त्यामध्ये शासकीय,निमशासकीय किंवा खाजगी सेवेतत नसल्यासबाबत. व अन्यत्र ठेकेदार म्हणून नोंदणी केली नसल्याबाबत . अन्य ठेकेदार नोंदणी प्राधिकरणाकडे ठेकेदारांचे काळ्या यादीत नाव नसल्याबाबत. उच्च शिक्षणाकरीता प्रवेश घेतला नसलेबाबत नमुद असणे आवश्यक आहे. |
33
| रोजगार हमी योजना | मजूर सहकारी संस्थेसाठी काय कागदपत्र आवश्यक आहेत? | मजूर सहकारी संस्थेकरीता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1) अर्ज 2) भागभांडवल यादी 3) लेखा ऑडिट 4) संस्था अस्तित्वात असल्याचा कालावधी 5) संस्था महासंघाशी सलग्न असल्याचा महासंघाचा दाखला 6) संस्थेकडे तांत्रिक सल्लागार असावा 7) संस्थेने केलेली कामे,व त्याचा दाखला 8) संस्थेकडे कामासाठी असणारेआवश्यक बांधकाम साहित्याची यादी 9) सभासदांचे ओळखपत्राची छायांकित प्रत 10) उपनिबंधक यांचे शिफारस पत्र 11) नोंदणी शुल्क र.रु.5000/- मात्र 12) काळ्यायादीत नसल्याबाबतचे 100/- बॉंडपेपरवर प्रतिज्ञापत्र |
34
| रोजगार हमी योजना | बांधकाम विभागाकडील कामे मंजूर झाल्यानंतर काय कार्यवाही केली जाते ? | बांधकाम विभागाकडील मंजूर झालेले काम प्रथम ग्रामपंचायतीना लेखी पत्राद्वारे कळविण्यात येते व त्यामध्ये 10 दिवसांची मुदत दिली जाते.त्या मुदतीत ग्रामपंचायतीकडून काम मागणी प्रस्ताव सादर केला तर ते काम ग्रामपंचायतीला दिले जाते. व दिलेल्या मुदतीत प्रस्ताव किंवा मागणी पत्र प्राप्त झाले नाही तर सदरचे काम हे काम वाटप समिती मध्ये वाटप केले जाते. त्यामध्ये 33:33:34 टक्के प्रमाणे वाटप केले जातात. 33 टक्के सु.बे. अभियंता 33 टक्के मजूर सहकारी संस्था, 34 टक्के खुली निविदा यांना वाटप केली जातात.खुली निविदाची कामे ही वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध केली जातात.व 3 लक्षाचे आतील कामांचे वाटप केले जाते व 3 लक्षावरील कामांचे ई निविदा केली जाते. |