(०२०) २६१३४८०६         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.

 

विभागाचे कार्य व उपक्रम.

मागासवर्गीयांचे सामजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणे व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळया योजना व उपक्रमाव्दारे करणेत येते. तसेच शासनाच्या धोरणात्मक आदेशानुसार जिल्हा परिषदांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान २० % निधी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणेसाठी सदर योजनांची अंमलबजावाणी व नियंत्रणाचे कार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन मा. समाज कल्याण समिती करते. शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना,शासन निर्णय व परिपत्रकान्वये या निधीमधुन खालीलप्रमाणे योजना राबविणेत येतात.

अं.क्र.योजनाकालावधीमाहिती 
1 अनुसुचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणे निरंक पहा
2 शारीरिक दृष्टया अपंगांना शिष्यवृत्ती शाररिक दृष्टया अपंगांना व्यवसायीक प्रशिक्षण पुर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांना स्वताचा व्यवसाय सुरु करणेसाठी आर्थिक सहाय्य देणेत येते. पहा
3 1 ली ते 10 वी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलामुलींना भारत सरकाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती 1. मान्यताप्राप्त शाळेतील इ. 1 ली ते 10 वी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलामुलींकरीता भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना. सदर शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव शाळेकडून विहीत नमुन्यात संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत या कार्यालयास सादर केले जातात. 2. विहीत नमुन्यातील अर्जासोबत विद्यार्थ्याचा जातीचा दाखला, बँक पासबुक व पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 2.50 लाख आहे. 3. शिष्यवृत्ती दर 10 महिन्यांकरिता- वसतिगृहात न राहणारा विद्यार्थी- रु.1500/-; वसतीगृहात राहणारा विद्यार्थी- रू. 5500/- पहा
4 मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे या कामांना मान्यता देणेत येते. योजनेच्या अटी व शर्ती -: 1) सदर योजनेतुन काम घेणेकरीता सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र. 2) ग्रामपंचायतीचा ठराव 3)कामाचे अंदाजपत्रक ( तांत्रिक मान्यतेसह ) 4) गावाची एकुण लोकसंख्या व संबधित मागास प्रवर्गातील अनु.जाती, अनु.जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या लोकसंखेचा दाखला. 5)प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबतचा दाखला. 6) सदर काम अन्य योजनेतुन प्रस्तवित केले नसलेचा ग्रामपंचायतीचा दाखला. 7) नविन रस्ता तयार करणेसाठी जागेचे बक्षीसपत्र 8) पाखाडी, संरक्षक भिंत बांधणेसाठी जागा मालकांचे संमत्तीपत्र. 9) जुना रस्ता असलेस ग्रामपंचायतीकडील नमुना नं. 23 चा उतारा. 10) सदर योजनेचा लाभ ज्या प्रस्तावित मागासवर्गीय वस्तीत होणार असलेबाबत सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला पहा
5 मागासवर्गीवस्तीत समाज मंदिर बांधणे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविणेसाठी समाजमंदीराची आवश्यकता असते. या योजनेतून मागासवर्गीय वस्तीमध्ये समाजमंदीर बांधली जातात. योजनेच्या अटी व शर्ती-: 1)सदर योजनेबाबत सरपंच व ग्राम सेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र. 2). ग्रामपंचायतीचा ठराव. 3)कामाची 2 अंदाजपत्रके (तांत्रिक मंजुरीसह). 4). गावची एकूण लोकसंख्या व संबंधीत मागास प्रवर्गातील (अनु.जाती/ अनु.जमाती /विमुक्त जाती व भटक्या जमाती)समाजाची लोकसंख्येचा दाखला. 5).नविन समाजमंदिर बांधण्यासाठी उपनिबंधक यांचे समक्ष जिल्हा परिषदेचे नांवे केलेले संबंधित जमीनीच्या मालकाचे बक्षिसपत्र व जमिनीचा 7/12 उतारु. 6).जुने समाजमंदिर असल्यास ग्रामपंचायतीकडील नमुना नं 22 चा उतारा 7)प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबत दाखला. 8)सदर काम अन्य योजनेतून प्रस्तावित केलेले नाही/ मंजूर नाही याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांचा दाखला. पहा
6 7% वनमहसुल योजना जिल्हा परिषदांना 7 टक्के वन महसुल अनुदानाचा विनियोग जिल्हा परिषदांनी आपल्या अधिपत्याखालील जंगल क्षेत्रामध्ये करावयाचा आहे. जंगल क्षेत्रामधील आदिवासींच्या उन्नत्तीसाठी व जंगल क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करावयाचा आहे. येाजनेच्या अटी व शर्ती-: 1).सदर योजनेबाबत सरपंच व ग्राम सेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र. 2).ग्रामपंचायतीचा ठराव. 3).कामाची 2 अंदाजपत्रके (तांत्रीकमान्यतेसह). 4).गावची एकूण लोकसंख्या व संबंधीत मागास प्रवर्गातील अनु.जाती/ अनु.जमाती /विमुक्त जाती व भटक्या जमाती)समाजाच्या लोकसंख्येचा दाखला. 5).प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबत दाखला. 6)सदर काम अन्य योजनेतून प्रस्तावित केलेले नाही/ मंजूर नाही याबाबत दाखला. 7). नविन रस्ता करणे, विहीर/विंधन विहिर/टाकी बांधणे, समाजमंदिर बांधणे इ. साठी लागणा-या जमिनीचा उपनिबंधक यांचे समक्ष जिल्हा परिषदेचे नांवे केलेले संबंधित जमीनीच्या मालकाचे बक्षिसत्र व जमिनीचा 7/12 उतारा 8).सदर योजनेचा लाभ वन महसुल क्षेत्रात रहाणा-या वस्तीला होणार असलेबाबत सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला. पहा
7 अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत जोडरस्ते करणे, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, समाज मंदिर बांधणे अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्यावस्तीत जोडरस्ते करणे, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे या कामांना मान्यता देणेत येते. योजनेच्या अटी व शर्ती -: 1) सदर योजनेतुन काम घेणेकरीता सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र. 2) ग्रामपंचायतीचा ठराव 3)कामाचे अंदाजपत्रक ( तांत्रिक मान्यतेसह ) 4) गावाची एकुण लोकसंख्या व संबधित मागास प्रवर्गातील अनु.जाती, अनु.जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या लोकसंखेचा दाखला. 5)प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबतचा दाखला. 6) सदर काम अन्य योजनेतुन प्रस्तवित केले नसलेचा ग्रामपंचायतीचा दाखला. 7) नविन रस्ता तयार करणेसाठी तसेच नविन समाज मंदिराची इमारत बांधणेसाठी जागेचे बक्षीसपत्र 8) पाखाडी, संरक्षक भिंत बांधणेसाठी जागा मालकांचे संमत्तीपत्र. 9) जुना रस्ता असलेस ग्रामपंचायतीकडील नमुना नं. 23 चा उतारा. 10) सदर योजनेचा लाभ ज्या प्रस्तावित मागासवर्गीय वस्तीत होणार असलेबाबत सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला पहा
8 अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवणे अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविली जाते. नविन विहिर व विंधन विहरीची खोदाई करणे, नविन टाकी बांधणे, न.पा.पू.योजना करणे इ. कामे या योजनेतून केली जातात. येाजनेच्या अटी व शर्ती-: 1).सदर योजनेबाबत सरपंच व ग्राम सेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र. 2).ग्रामपंचायतीचा ठराव. 3).कामाची 2 अंदाजपत्रके (तांत्रीकमान्यतेसह). 4).गावची एकूण लोकसंख्या व संबंधीत मागास प्रवर्गातील अनु.जाती/ अनु.जमाती /विमुक्त जाती व भटक्या जमाती)समाजाच्या लोकसंख्येचा दाखला. 5).भूजल वैज्ञानिक यांचेकडून पाणी उपलब्धतेबाबत दाखला. 6).प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबत दाखला. 7)सदर काम अन्य योजनेतून प्रस्तावित केलेले नाही/ मंजूर नाही याबाबत दाखला. 8). विहीर/विंधन विहिर/साठवण टाकी करीता लागणा-या जमिनीचे बक्षिसत्र व जमिनीचा 7/12 उतारा 9).सदर योजनेचा लाभ ज्या प्रस्तावीत मागास वर्गिय वस्तीत होणार असलेबाबत सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला. पहा
9 1 ली ते 10 वी मधील DNT (विमुक्त जाती व भटक्या जमाती) मधील मुलांमुलींना भारत सरकारची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 1. मान्यताप्राप्त शाळेतील इ. 1 ली ते 10 वी मधील विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील मुलामुलींकरीता भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना. सदर शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव शाळेकडून विहीत नमुन्यात संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत या कार्यालयास सादर केले जातात. 2. विहीत नमुन्यातील अर्जासोबत विद्यार्थ्याचा जातीचा दाखला, बँक पासबुक व पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2.00 लाख आहे. 3. शिष्यवृत्ती दर 10 महिन्यांकरिता- 1. इ. 1ली ते 8 वी मधील विद्यार्थी- रू. 1000/- इ. 9 वी व 10 वी मधील विद्यार्थी- रू. 1500/- पहा
10 इ.9 वी व 10 वी मधील अनु.जातीच्या मुलांमुलींना भारत सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 1. मान्यताप्राप्त शाळा, CBSE/ICSE शाळेतील इ. 9 वी व 10 मधील अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी भारत सरकारची सदरची योजना लागु आहे. सदर शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव शाळेकडून विहीत नमुन्यात संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत या कार्यालयास सादर केले जातात. 2. विहीत नमुन्यातील अर्जासोबत विद्यार्थ्याचा जातीचा दाखला, बँक पासबुक व पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा-2.50 लाख आहे. 3. शिष्यवृत्ती दर 10 महिन्यांकरिता- 1. वसतिगृहात न राहणारा विद्यार्थी- रू. 2250/-; 2. वसतिगृहात राहणारा विद्यार्थी- रू. 4500/- पहा
11 इ.८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसुचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनु जातीतील मुलींना दरमहा 100 प्रमाणे शिष्यवृत्ती अदा केली जाते पहा
12 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांस (अनु.जाती) विद्यावेतन देणेत येते पहा
13 स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान निरंक पहा
14 महाराष्ट्रातील मान्यवर वृध्द कलावंत व साहित्यकांना मानधन योजना 1. कलाक्षेत्रात 30 वर्षे अनुभव असणा-या व वयाची 50 वर्षे पूर्ण असणारे कलाकारांना मानधन देणेसाठीची योजना आहे. 2. योजनेचे निकष -1. कलाकाराची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रू. 48000/-; वय- 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. 3. विहीत नमुन्यातील अर्जासोबत वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला तसेच कलेचे 03 पुरावे जोडणे आवश्यक आहे. सदरचा आवश्यक कागपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्यांच्या गटविकास अधिकारी यांचेमार्फत या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. 2. कलावंत मानधनाचे दर (दरमहा) - 1. अ श्रेणी- रू. 3150/-; ब श्रेणी- रू. 2700/- ; 3. क श्रेणी- रू. 2250/- 3. रत्नागिरी जिल्हास्तरीय वृध्द कलावंत व साहित्यिक निवड समितीद्वारे पात्र कलावंत व साहित्यिकांची श्रेणी ठरवून निवड करणेत येऊन त्यांची मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचेकडे मानधनाकरीता शिफारस केली जाते. मा. संचालक यांचेकडून संबंधित मंजुर कलावंत/साहित्यिकांच्या बँक खात्यामध्ये मानधन वर्ग करणेत येते. पहा
15 इ.५वीते७वीमध्येशिकणा-यामुलींनासावित्रीबाईफुलेशिष्यवृत्ती 1. मान्यताप्राप्त शाळेत शिक्षणघेणा-याइयत्ता५वीते७वीमधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागासवर्गातील मुलींकरीता सदरची योजना राबविणेत येते. सदर शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव शाळेकडून विहीत नमुन्यात संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत या कार्यालयास सादर केले जातात. 2. विहीत नमुन्यातील अर्जासोबत बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. 3. शिष्यवृत्ती दर 10 महिन्यांकरिता- रू. 600/- 4. सदर योजनेकरीता वार्षिक उत्पन्नाची अट नाही. पहा
16 इ.८ वी ते १० वी मध्ये शिकणा-या मुलींना सावित्रीबाईफुले शिष्यवृत्ती 1. मान्यताप्राप्त शाळेत शिक्षणघेणा-याइयत्ता8वीते10वीमधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागासवर्गातील मुलींकरीता सदरची योजना राबविणेत येते. सदर शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव शाळेकडून विहीत नमुन्यात संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत या कार्यालयास सादर केले जातात. 2. विहीत नमुन्यातील अर्जासोबत बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. 3. शिष्यवृत्ती दर 10 महिन्यांकरिता- रू. 1,000/- 4. सदर योजनेकरीता वार्षिक उत्पन्नाची अट नाही. पहा
17 मागासवर्गीय बालवाड्यांना आर्थिक सहाय्य मागासवर्गीय वस्तीतील समाजकल्याण विभागाकडील मान्यताप्राप्त बालवाडयांना अनुदान दिल जाते. त्यामध्ये सेविका मानधन, व मुलांचे खाऊचे अनुदान दिले जाते. पहा
18 अपंग व्यक्तीकरिता क्रीडा प्रबोधनी स्थापन करणे व क्रीडा संचालनायाच्या मान्यतेने क्रीडा स्पर्धा आयोजन करणे जिल्हायातील अपंग(मतिमंद,कर्णबधिर,मुकबधिर, अंध इ.) विदयार्थ्याच्या शाळांतील तसेच प्राथमिक शाळांतील सर्व शिक्षण अभियान अंतर्गत विशेष मुले याची प्रवर्गनिहाय वयोगटनिहाय जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली जाते. अटी व शर्ती जिल्हायातील विशेष शाळांतील विदयार्थी तसेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अपंग विद्यार्थि असावा. मंजूर अनुदान: र.रु.250000/- (सन 2014-15 ) अर्ज कोणाकडे करावा: समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी. पहा
19 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी मान्यताप्राप्त सर्व स्तरावरील शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी,परिक्षा फी प्रदान करणेत येते सदर योजना अनु.जाती,अनु जमाती विमुक्त जाती, व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता लागु आहे पहा
20 इ.५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती माध्यमिक शाळेत शिक्षण घेणा-या इयत्ता 5 वी ते 7 वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करणेसाठी शिक्षणास प्रोत्साहन देणेसाठी ही योजना सुरु झाली आहे पहा
21 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन 1. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण घेणा-या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रशिक्षणार्थ्यास विद्यावेतन देणेत येते. सदर योजनेचे प्रस्ताव संबंधित संस्थेकडून विहीत नमुन्यात सादर केले जातात. 2. विहीत नमुन्यातील अर्जासोबत बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. 65,290/- पेक्षा जास्त नसावे. 3. संस्थेच्या वसतिगृहात राहणा-या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा रू. 60 विद्यावेतन देणेत येते त्या विद्यार्थ्यास या विभागाकडून दरमहा 40/- पूरक विद्यावेतन 12 महिन्यांकरीता देणेत येते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यावेतन देणेत येत नाही त्यांना या विभागाकडून दरमहा रू. 100/- विद्यावेतन 12 महिन्यांकरीता देणेत येते. 4. संस्थेच्या वसतिगृहात न राहणा-या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा रू. 40 विद्यावेतन देणेत येते त्या विद्यार्थ्यास या विभागाकडून दरमहा 20/- पूरक विद्यावेतन 12 महिन्यांकरीता देणेत येते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यावेतन देणेत येत नाही त्यांना या विभागाकडून दरमहा रू. 60/- विद्यावेतन 12 महिन्यांकरीता देणेत येते. पहा
22 अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे अपंग व सदृढ व्यक्तीमधील विषमतेची दरी कमी करणे, समाजात सामाजिक ऐक्याची भावना दृढ व्हावी, समाज एकसंध रहावा व त्याच्यात भातृभाव निर्माण व्हावा म्हणून ही योजना राबविली जाते. अटी व शर्ती 1)अर्जदार ग्रामीण भागातील असावा. 2.विवाह नोंदणी अधिकारी यांचेकडील विवाहाचा दाखला 3. वधू व वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला 4.वधू किंवा वर (अस्थिव्यंग, मतिमंद किंवा मुकबधीर 40% तसेच अंध 100 %) अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील वैद्यकीय प्रमाणपञ व सदृढ व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नाही असे प्रमाणपञ असणे आवश्यक आहे. 5.आंतरजातिय किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसेल याबाबत ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक. 6.लग्नाच्या तारखेस वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 7. ग्रामसेवक व सरपंच यांचेकडील शिफारसपञ असणे आवश्यक. 8. गटविकास अधिकारी यांचेकडील शिफारस पञ. 9. अर्जदारांचा एकञित फोटो असावा. 10. प्रत्येक अपंग व सदृढ विवाहीत जोडप्यास 50000/-रु. धनाकर्षाद्वारे अनुदेय देय राहिल. 11. वधू व वर यांचे रेशनकार्ड याची प्रत. 12. 1/04/2007 नंतर विवाह झालेल्या दांपत्यास सदर योजनेचा लाभ देणेत येईल. 13. वरील अटींची पूर्तता नसलेले व अपूर्ण अर्ज दप्तरी दाखल करून निकाली काढणेत येतील व त्याबाबत पञव्यवहार केला जाणार नाही. अर्ज कोठे मिळेल: ग्रामपंचायत विभाग, पंचायत समिती कार्यालय तसेच जिल्हा समाजकल्याण आधिकारी , जि.प. रत्नागिरी अर्ज कोणाकडे करावा : गटविकास अधिकारी पं.स. यांचेमार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प. यांचेकडे सादर करावा. लाभार्थीची निवडीची पध्दत परिपूर्ण प्रस्तावास विषय समिती कडून मंजूरी घेतली जाते. पहा
23 अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती सदर व्यवसायात भंगी व्यवसाय,मेहतर व्यवसाय, कातडी सोलने व कातडी कमावणे इ. व्यवसाय करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपुर्व शिक्षण घेता यावे या उद्येशाने विद्यावेतन दिले जाते पहा
24 आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य या योजनेनुसार 1 व्यक्तीस सवर्ण हिंदु लिंगायत, शिख इतर मागासर्वीय आणि दुसरी व्यक्ती अनु.जाती/अनु.जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/नवबौध्द असणे आवश्यक आहे. पहा
25 लघुउद्योगांसाठी नि:समर्थ व्यक्तीना(अपंग) वित्तीय सहाय्य या योजनेखाली अपंग व्यक्तींना प्रकल्प खर्चाच्या 20% आथवा कमाल रु 30000/- समाज कल्याण विभागाकडुन अनुदान बिज भांडवल स्वरुपात देणेत येते.उर्वरीत 80% भाग बॅकेकडुन कर्ज स्वरुपात उपलब्ध होतो. पहा
26 अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे अ) अंध व्यक्तीसाठी- मोबईल फोन, लॅपटॉप,/ संगणक (जॉस सॉफ्टवेअर), बेल, नोट वेअर, Communication equipment Braille attachment telephone, adapted walers , ब्रेल लेखन साहित्य, ब्रेल टाईपरायटर, टॉकींग टाईपरायटर, लार्ज प्रिंट बुक, अल्पदृष्टी अपंगत्वावर मात करणेसाठी digital magnifiers इत्यादी साधने व उपकरणासाठी अर्थसहाय्य देणे. ब) कर्णबधीर व्यक्तीसाठी :- विविध प्रकारची वैयक्तिक श्रवणयंत्रे (बीटीईसह) शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, संगणकासाठी सहाय्यभूत उपकरणे क) अस्थिव्यंग व्यक्तीसाठी :- कॉलीपर्स, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंचलीत तीन चाकी सायकल, कुबड्या, कृत्रिम अवयव, प्रोस्थेटिक अॅण्ड डिव्हायसेस, वॉकर, सर्जिकल फुटवेअर, स्प्लीटस, मोबालिटी एड्स, कमोड स्टुल, स्पायनल ऑण्ड निल वॉकी ब्रेस, डिव्हायसेस फॉर डेली लिव्हींग इत्यादी. ड) मतिमंद व्यक्तीसाठी:- मतिमंदासाठी शैक्षणिक साहित्य संच (MR kits), बुद्धीमत्ता चाचणी संच, सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधणे. इ) बहुविकलांग व्यक्तीसाठी :- संबंधित क्षेत्रातील तज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे, सी.पी.चेअर स्वयंचलीत सायकल व खुर्ची, संगणक वापरण्यासाठी सहाय्यभूत उपकरणे. फ) कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्ती :- कुष्ठरोगमुक्त अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साधणे, सर्जिकल अॅण्ड करेक्टीव्ह फूटवेअर्स, सर्जिकल अप्लांसेंस, मोबालिटि एड इत्यादी. अपंग व्यक्तीना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे.(व्हेन्डीग स्टॉल/पिठाची गिरणी/शिलाई मशीन/मिर्ची कांडप मशीन/फूड प्रोसेसिंग युनिट/झेरॉक्स मशीन इत्यादी) अपंग शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता शेतीविषयक औवजारे, मोटरपंप, विहीर खोदणे, गाळ काढणे, पाईपलाईन करणे, मळणीयंत्र, ठिबक सिंचन इत्यादीसाठी व बी-बियाणांसाठी अर्थसहाय्य देणे. अपंग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी (शेळीपालन, कुक्कुटपालन,वराहपालन,मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे.) अपंग शेतकऱ्यांना फळबागासाठी अर्थसहाय्य देणे. मतिमंद व्यक्तीकरीता नॅशनल ट्रस्टमार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनांचे हप्ते (प्रिमियम) भरणेसाठी अर्थसहाय्य देणे. अपंग विद्यार्थ्यांना सर्व समावेशक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्यांचा मदतनिसांना मदतनिसाना भत्ता देणे. केंद्र शासनाच्या लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी पुर्वतयारी करीता स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम देणे. सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पिडीत अपंग महिलांना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देणे. अपंग व्यक्तीना दुर्धर आजाराच्या वैदयकीय उपचारासाठी अर्थसाहाय्य देणे. उदा. कॅन्सर, क्षयरोग, मेंदूचे विकार, ह्रद्य शस्त्रक्रिया इत्यादी अपंग प्रमाणपत्र वितरीक करण्याकरीता विशेष मोहिम व शिबीराचे आयोजन करणे. पहा
27 मागासवर्गीयांसाठी समाज मंदिर बांधणे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविणेसाठी समाजमंदीराची आवश्यकता असते. या योजनेतून मागासवर्गीय वस्तीमध्ये समाजमंदीर बांधले जाते. योजनेच्या अटी व शर्ती 1. सदर योजनेबाबत सरपंच व ग्राम सेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र. 2. सदर योजनबाबत ग्रामपंचायतीचा ठराव. 3. सदर कामाची 3 अंदाजपत्रके (तांत्रिक मंजुरीसह). 4. गावची एकूण लोकसंख्या व संबंधीत मागास प्रवर्गातील (†नु.जाती/ अनु.जमाती /विमुक्त जाती व भटक्या जमाती)समाजाची लोकसंख्या दाखला. 5. समाजमंदिर बांधण्यासाठी स्टँप पेपरवर उपनिबंधक यांचे समक्ष जिल्हा परिषदेचे नांवे केलेले संबंधित जमीनीच्या मालकाचे बक्षिसपत्र व जमिनीचा 7/12 उतारु. 6. प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबत दाखला. सदर काम अन्य योजनेतून प्रस्तावित केलेले नाही/ मंजूर नाही याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांचा दाखला. पहा
28 मागासवर्गीय मुलांना संगणक प्रशिक्षण देणे मागासवर्गीय मुलांना संगणक साक्षर व्हावेत तसेच MSCIT कोर्स हा शासन सेवेमध्ये किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करताना अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे सदरचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. योजनेच्या अटी व शर्ती-: 1) स्वत:चा जातीचा दाखला. 2)गुणपत्रक किमान 10वी पास. 3)पासपोर्ट साईज एक फोटो. 4) मागील आर्थिक वर्षाचा वडील/पालकांच्या नावे तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला- (रु.1,00,000/- पर्यंत किंवा दारिद्रय रेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला) 5) रेशन कार्ड 6) संगणक प्रशिक्षण संस्थेकडे फी भरलेची ऑनलाईन पावती. 7) बॅंक पासबुकची झेरॉक्स . 8) आधार कार्डची झेरॉक्स. 9) अर्जदार ग्रामिण क्षेत्रातील असणे आवश्यक. 10)अनु. जाती/जमाती, वि.जा., भ.ज. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल. वरील सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक असते. पहा
29 मागासवर्गीय वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवणे मागासवर्गीय वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविली जाते. विहिर,विंधन विहिर बांधणे, विहिर दुरुस्ती, वृध्दीकरण, टाकी बांधणे, दुरुस्ती, न.पा.पू.योजना इ. कामे या योजनेतून केली जातात. येाजनेच्या अटी व शर्ती-: 1).सदर योजनेबाबत सरपंच व ग्राम सेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र. 2).ग्रामपंचायतीचा ठराव. 3).कामाची 2 अंदाजपत्रके (तांत्रीकमान्यतेसह). 4).गावची एकूण लोकसंख्या व संबंधीत मागास प्रवर्गातील अनु.जाती/ अनु.जमाती /विमुक्त जाती व भटक्या जमाती)समाजाच्या लोकसंख्येचा दाखला. 5).भूजल वैज्ञानिक यांचेकडून पाणी उपलब्धतेबाबत दाखला. 6).प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबत दाखला. 7)सदर काम अन्य योजनेतून प्रस्तावित केलेले नाही/ मंजूर नाही याबाबत दाखला. 8). विहीर/विंधन विहिर/टाकी इ. साठी लागणा-या जमिनीचा उपनिबंधक यांचे समक्ष जिल्हा परिषदेचे नांवे केलेले संबंधित जमीनीच्या मालकाचे बक्षिसत्र व जमिनीचा 7/12 उतारा 9).सदर योजनेचा लाभ ज्या प्रस्तावीत मागास वर्गिय वस्तीत होणार असलेबाबत सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला. पहा
30 माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती 1. मान्यताप्राप्त शाळेत शिक्षणघेणा-याइयत्ता५वीते10वीमधील अनुसूचित जाती, अनुसचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींकरीता सदरची योजना राबविणेत येते. सदर शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव शाळेकडून विहीत नमुन्यात संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत या कार्यालयास सादर केले जातात. 2. प्रत्येक इयत्तेतील मागासर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम दोन क्रमांकात येणारे विद्यार्थी (वार्षिक परिक्षेत 50% पेक्षा अधिक गुण आवश्यक) 2. विहीत नमुन्यातील अर्जासोबत बँक पासबुकची व मागील शैक्षणिक वर्षाच्या निकालाची प्रत जोडणे आवश्यक आहे. 3. शिष्यवृत्ती दर 10 महिन्यांकरिता- 1. अनुसूचित जातीकरीता - इ. 5 वी ते 7 वी- रू. 500/- व इ. 8 वी ते 10 वी- रू. 1000/- 2. वि.जा.भ.ज., वि.मा.प्र. व अनु. जमाती करीता- इ. 5 वी ते 7 वी- रू. 200/- व इ. 8 वी ते 10 वी- रू. 400/- 4. सदर योजनेकरीता वार्षिक उत्पन्नाची अट नाही. पहा
31 अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहीम स्वयंसेवी संस्थांना सहाय्य व्यसनमुक्ती प्रचार कार्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण/शहरी भागामध्ये प्रचाराचे विविध कार्यक्रम राबविणेत येतात त्यामध्ये किर्तन भजन,कलापथक इ त्याचप्रमाणे शाळा कॉलेज यांच्यामध्ये अनुक्रमे संस्कारमंच व नशाबंधी विवाहमंच तसेच ग्रामीण भागामध्ये महिला मंडळी युवा मंडळी याद्यारे व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पहा
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 समाज कल्याण विभागशासनाकडून किती रुपये अनुदान दिले जाते ?दि.०१.०२.२०१० पुर्वी लग्न केलेल्या दांपत्यांना रू १५,०००/- तर या दिनांकानंतर लग्न केलेल्या दांपत्यांना रू. ५०.०००/- इतके अनुदान दिले जाते.
2 समाज कल्याण विभागजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ३% सेस योजनेतून नि:समर्थ व्यक्तीना कोणते वैयक्तीक लाभ दिले जातात?जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत नि:समर्थ व्यक्तींच्या कल्याणाकरीता खालील वैयक्तीक लाभाच्या योजना निश्चित केल्या असून सदर योजनेसाठी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य पुरविणेत येते.
3 समाज कल्याण विभागजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ३% सेस योजनेअंतर्गत नि:समर्थ व्यक्तीना दिल्या जाणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्जा सोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत नि:समर्थ व्यक्तीच्या कल्याणाकरिता दिल्या जाणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्र जोडाणे आवश्यक आहेत. १) मा. सरपंच यांचा गावचा रहिवाशी असल्याचा दाखला. २) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत. ३) लाभार्थ्यांचे नांव असलेल्या रेशनकार्डची प्रत. ४) लाभार्थ्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्राची प्रत. (मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ऑनलाईन केलेले अर्जातील अनु.क्र.१ चे अनुषंगाने) ५) लाभार्थ्यांच्या बँक पासबुकाची प्रत.(अर्जातील अनु.क्र. ३ व ४ चे अनुषंगाने) ६) लाभार्थ्यांच्या आधार कार्डची प्रत.(अर्जातील अनु.क्र. ५ चे अनुषंगाने) ७) शासन निर्णय क्र. अपंग २०१५/प्र.क्र.१३७/वित्त-३, दि. २४ नोव्हेंबर, २०१५ मधील ‘ब’ वैयक्तीक लाभाच्या योजनांमधून कोणती वस्तू/साहित्य घेवू इच्छिता त्या साहित्याचे वैशिष्ट्य(Specification) व बाजारभाव दर्शविणारे माहितीपत्राची प्रत (कोटेशन) (अर्जातील अनु.क्र. ७ व ८ चे अनुषंगाने) ८) नि:समर्थ व्यक्तीनी सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरीता अर्थसहाय्य मागणी प्रस्तावासोबत त्या क्षेत्राशी संबधीत तज्ञाचे शिफारसपत्र जोडावे. ९) नि:समर्थ व्यक्तीनी व्यवसाय उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मागणी करताना त्यांचे वय १८वर्षे पुर्ण असावे.
4 समाज कल्याण विभागमानधन केव्हा जमा होईल?सदर योजनेअंतर्गत कलाकाराचे मानधन सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई कार्यालयामार्फत थेट कलाकाराच्या बँक खात्यात जमा केले जात असल्यामुळे सदर बाबतीत हे कार्यालय अनभिज्ञ असल्यामुळे माहिती देवू शकत नाही. तसेच मानधन प्राप्त होत नसल्यास कलाकाराने या कार्यालयाकडे लेखी तक्रार केल्यास सदर तक्रारी मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचेकडे पाठवून पाठपुरावा करण्यात येईल.
5 समाज कल्याण विभागप्रस्ताव मंजुर झाला काय ?रत्नागिरी जिल्हास्तरीय वृध्द कलाकार व सांस्कृतिक समितीच्या शिफारशीनंतर मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचेकडून मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतर कलाकाराचा प्रस्ताव मंजुर होऊन त्यास मानधन सुरु होते.
6 समाज कल्याण विभागपथदिव्यांचा प्रस्ताव करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?योजनेच्या या चेकलिस्टनुसार पथदिव्यांचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने संबधित गटविकास अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह पंचायत समितीमार्फत या कार्यालयास सादर करावयाचा आहे.
7 समाज कल्याण विभागप्रस्ताव कधी मंजुर होतात?परिपूर्ण प्रस्तावांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजुरी दिली जाते व पथदिवे बसविण्याचा मंजुरी आदेश अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. रत्नागिरी यांना दिले जातात.
8 समाज कल्याण विभागप्रस्ताव करण्यासाटी कोणती कागदपत्रे लागतात तसेच अर्जाचा नमुना भेटेल का?योजनेच्या विहीत नमुन्यातील अर्जामध्येच प्रस्तावास आवश्यक कागदपत्रे नमुद केलेली आहेत. सदर कागदपत्रांच्या सत्यप्रती प्रस्तावास जोडून मुळ कागदपत्रांसह वैयक्तिकरित्या हजर राहून कार्यालयास सादर करावा.
9 समाज कल्याण विभागप्रस्तावास लाभ केव्हा देण्यात येईल ?शासनाकडून अनुदान प्राप्त होताच प्रस्ताव सादर केलेल्या दिनांकानुसार क्रमवारी लावून प्रस्ताव मंजुर केले जातील व मंजुर यादीमध्ये नाव असल्याचे व संबंधित धनाकर्ष घेवून जाण्याबाबत या कार्यालयाकडून पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे कळविले जाईल.
10 समाज कल्याण विभागअनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजने अंतर्गत पाणी पुरवठा सुविधा/गटार/जोडरस्ते/समाजमंदीरांचे प्राप्त झालेले प्रस्ताव मंजुर का होत नाहीत?सदरचे काम, बृहत आराखड्यात असणे आवश्यक आहे. :- सदर वाडी/वस्ती अंदाजपत्रकानुसार अनुज्ञेय रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे. :- चेकलिस्टप्रमाणे प्रस्ताव परिपूर्ण असणे आवश्यक आहे. :- सदर कामास समाज कल्याण समितीने मंजुरी देणे आवश्यक आहे. :- समाजकल्याण समितीने निवड केलेल्या कामांचे प्रस्ताव अपूर्ण असल्यास ते परिपुर्ण करण्याकरीता संबधित ग्रामपंचायतीला/गटविकास अधिकाऱ्यांना त्याबाबतीत कळविले जाते व प्रस्ताव परिपूर्ण करण्याची कार्यवाही करणेत येते. :- आर्थिक वर्षात प्राप्त अनुदान वाटप करताना तालुकानिहाय अनुसुचित/नवबौध्द घटकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात येते.
11 समाज कल्याण विभागप्रस्ताव करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, चेकलिस्ट आहे काय ?या चेकलिस्टनुसार साक्षांकित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यामध्ये करावा. प्रस्ताव ०२ प्रतीत गटविकास अधिकारी यांचेमार्फत किंवा प्रत्यक्ष या कार्यालयास सादर करणेत यावा.
माहिती उपलब्ध नाही