(०२०) २६१३४८०६         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.

 

प्रस्तावना

भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उददीष्ट सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते व साथरोग नियंत्रण उदा.प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने प्राधान्याने कॅन्टोमंेंट भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे अस्तित्वात असलेल्या पारंपारिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले. सुरवातील मोठया शहरात हॉस्पिटल व दवाखाने यांच्यामार्फत उपचारात्मक सेवा देणे सुरु केले. नियोजन समितीने 1940 साली ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणेची सूचना केली व 1000 लोकसंख्येला 1 आरोग्य सेवक व प्रमाणात आरोग्य सेवकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले पहिले प्राथमिक आरोग्य केंद्ग 1942 साली कलकत्याजवळ (पश्चिम बंगाल) शिंगुर या गावी सुरु केले. त्याला ग्रामीण आरोग्य पथक असे संबोधण्यात आले. ग्रामीण आरोग्य सेवा डॉ.जेम्स ग्रॅड, संचालक, अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला आहे. त्याचसुमारास मुंबई प्रांत सरकारच्या आर्थिक सहाय्याने आरोग्य सेवा पदध्ती महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. 1977 साली झालेल्या 13 व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश यांनी समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उदिदष्ट ठरविले हेच 2000साली सर्वांना आरोग्य या नावाने प्रसिध्द झाले. या उदिदष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हिच गुरुकिल्ली आहे हे स्विकत करण्यात आले.

आरोग्य संस्थाद्वारे मिळणाऱ्या विविध सेवा

माता आणि बालकांचे आरोग्य :-

अ) प्रसुतीपूर्व काळजी :-

सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी (१२ आठवडयांचे आत) गरोदरपणात कमीत कमी पाच वेळा तपासणी :- पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबरच, दुसरी तपासणी (१२ आठवडेत) तिसरी तपासणी ४ ते ६ महिन्यांमध्ये (२६ आठवडे) चौथी तपासणी आठव्या महिन्यामध्ये (३२ आठवडे) तर पाचवी तपासणी ९ व्या महिन्यामध्ये (३६ आठवडे) संलग्र आवश्यक सेवा जसे सर्वसाधारण तपासणी, वजन, रक्तदाब, रक्तक्षयाकरिता तपासणी, पोटावरुन तपासणी, उंची, स्तनांची तपासणी, पहिल्या तिमाहीत फोलिक अ‍ॅसिडचे सेवन, १२ आठवडयानंतर लोह, फोलिक अ‍ॅसिड गोळयांचे सेवन, धर्नुवात प्रतिबंधक लसीची मात्रा, रक्तक्षयावरील उपचार इ. (आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनांनूसार) प्रयोगशाळेतील तपासण्या जसे हिमोग्लोबीन, लघवीतील प्रथिने व साखरेची तपासणी. जोखमीच्या गरोदर मातांचे निदान व तत्पर योग्य ठिकाणी संदर्भसेवा.

ब) प्रसुतीदरम्यान सेवा :-

आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यावर भर देणे. (प्रवृत्त करणे) स्वच्छतेच्या ५ नियमांचे पालन करुन प्रशिक्षित व्यक्तीकडून बाळंतपण करणे. तत्पर व योग्यठिकाणी संदर्भसेवा देणे.

क) प्रसुतीपश्चात सेवा :-

प्रसुतीपश्चात कमीत कमी २ वेळा गहभेटी देणे. पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत तर दुसरी ७ ते १० दिवसांच्या दरम्यान गहभेट देणे. मूल कमी वजनाचे असल्यास ४८ तासांच्या आत तसेच ७,१४,२१ व २८ दिवसात अशा पाच भेटी द्याव्यात. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. सल्ला व समुपदेशन :- आहार व विश्रांती, स्वच्छता, गर्भनिरोधन, नवजात बालकाची काळजी, अर्भक व मुलांचा आहार तसेच लैगिक आजार, ए.आय.व्ही.एड्‌स इ.बाबत.

क) प्रसुतीपश्चात काळजी :-

उपकेंद्गाच्या कर्मचार्‍यामार्फत कमीत कमी २ प्रसुतीपश्चात गृहभेटी :- पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत व दुसरी प्रसुतीनंतर ७ दिवसांच्या आत. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. आहार, स्वच्छता, कुटूंबनियोजनाबाबत आरोग्य शिक्षण देणे.

ड) बालकाचे आरोग्यः-

  • नवजात अर्भकाची काळजी
  • ६ महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान देणे.
  • सर्व अर्भकांचे व मुलांचे लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द लसीकरण करणे.
  • ५ वर्षापर्यंत सहा-सहा महिन्यांनी अ जिवनसत्वे ९ डोस देणे.
  • बालकांमधील कुपोषण आणि आजारांचे प्रतिबंधन व उपचार करणे.

बालकांची काळजी :-

  • अ) नवजात अर्भकाची काळजी :-
  • नवजात अर्भकासाठी सोयी व तज्ञसेवा

नवजात अर्भकामधील तापमान कमी होण व कावीळ आजाराचे व्यवस्थापन.

  • ब) बालकाची काळजीः-
  • नवजात शिशु व बालकांमधील आजारांच्या एकात्मिक व्यवस्थापनासह ( IMNCI ) आजारी बालकांची तातडीची काळजी.
  • बालकांमधील नेहमीच्या आजारांची काळजी.
  • जन्मानंतर पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानास प्रवत्त करणे.
  • लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अर्भकांचे व बालकांचे संपूर्ण लसीकरण करणे.
  • अ जीवनसत्वाचे प्रतिबंधात्मक डोस देणे.

कुपोषण, जंतूसंसर्ग यांसारख्या बालकांमधील आजारांचे प्रतिबंधन व नियंत्रण इ.

  • कुटूंबनियोजन आणि गर्भनिरोधन :-

कुटूंबकल्याणाची योग्य ती पध्दत वापरण्यासाठी, आरोग्य शिक्षण देणे, प्रवत्त करणे व समुपदेशन करणे. कुटूंबनियोजनाच्या साधनांची उपलब्धता - निरोध, तांबी, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तात्काळ गर्भनिरोधन इ. कुटूंबकल्याणाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबणार्‍या योग्य जोडप्यांसाठी पाठपुराव्याच्या सेवा. आवश्यकतेनुसार सुरक्षित गर्भपातासाठी समुपदेशन व योग्य प्रकारे संदर्भसेवा.

  • पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :-

आरोग्य शिक्षण, समुपदेशन व संदर्भसेवा शालेय आरोग्य सेवेसाठी मदत

  • उपचारात्मक सेवा :-

किरकोळ आजारावर औषधोपचार उदा.ताप, अतिसार, श्वसनसंस्थेचे आजार, जंताचे विका, अपघात व तात्कालिक परिस्थितीत करावयाचे प्रथमोपचार. तत्पर व योग्य संदर्भसेवा. प्राथमिक आरोग्य केंद्गाचे वैद्यकीय अधिकारी आशा अंगणवाडी सेविका, पंचायत राज संस्था, स्वयंसहाय्यता गट यांच्या मदतीने अंगणवाडीमध्ये कमीतकमी दरमहा एक आरोग्य दिवस आयोजित करणे.

  • जीवनविषयक घटनांची नोंद:-

जन्म - मत्यू, मातामत्यू , अर्भकमत्यू यांसारख्या जीवनविषयक आकडेवारीची (घटनांची) नोंद घेणे व अहवाल पाठविणे (२१ दिवसांचे आत)

प्राथमिक आरोग्य केंद्ग

  • अ) वैद्यकीय सेवा

बाहयरुग्ण सेवा :- ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी.

२४ तास तातडीची सेवा :- जखमा व अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश व इतर तातडीच्या रुग्णांना योग्य सेवा देणे.

संदर्भसेवा :- ज्या रुग्णाला विशेषज्ञांच्या सेवेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना योग्य व तत्पर संदर्भसेवा :- रुग्णांना पुर्वपदावर आणणे ( Stablization ) संदर्भसेवेच्या प्रवासा दरम्यान रुग्णांना योग्य त्या अनुषंगिक सेवा देणे. प्रा.आ.केंद्गाच्या वाहनातून अथवा वैद्यकीय अधिकार्‍यांजवळ असलेल्या उपलब्ध अनुदानातून, भाडयाच्या वाहनातून संदर्भसेवा देणे.

आंतररुग्ण सेवा ( ६ बेड )

कुटूंब कल्याण्स सेवा

योग्य कुटूंबनियोजनाच्या पध्दती अवलंबिण्यासाठी शिक्षण, मतपरिवर्तन व समुपदेशन करणे. गर्भनिरोधक साधने उपलब्ध करुन देणे. उदा.निरोध, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तातडीच्या वेळी घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तांबी इ. कायमस्वरुपी पध्दती जसे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया , पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया/बिनटाकाच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसारख्या कुटूंबनियोजनाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबिलेल्या योग्य जोडप्यांसाठी पाठपूरावा सेवा प्रशिक्षित व्यक्त्‌ी व साधने उपलब्ध आहेत अशा ठिकाण डाटा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय गर्भपाताच्या सेवा व त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणेत येईल.

वरील सेवांखेरील प्राथमिक आरोग्य केंद्ग जननी सुरक्षा योजनेच्या सुविधाही पुरवतील.

प्रजनन संस्थेचे आजार / लैगिक आजारांचे व्यवस्थापन

प्रजनन संस्थेचे आजार/लैंगिक आजार यांच्या प्रतिबंधनासाठी आरोग्य शिक्षण प्रजनन संस्थेचे आजार/लैगिक आजार यांचा उपचार. आहारविषयक सेवा (एकात्मिक बालविकास सेवा योजनेबरोबर समन्वयाने) शालेय आरोग्य :- नियमित तपासणी, योग्य उपचार, संदर्भसेवा व पाठपूरावा. पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :- जीवनकौशल्या प्रशिक्षण, समुपदेशन, योग्य उपचार. सुरक्षित पाठपुरावा व स्वच्छता यांसाठी प्रवृत्त करणे. त्या भागात कायमस्वरुपी आढळणारे आजार. उदा.हिवताप, काला आजार, जपानी, मेंदूदाह इत्यांदीचे प्रतिबंधन व नियंत्रण. रोगसर्वेक्षण आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण अस्वाभाविक आरोग्य घटनांबाबत जागरुकता व योग्य उपाययोजना पाणी साठयांचे निर्जुंतीकरण पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी राष्ट!ीय साथरोग नियंत्रण संस्थेने तयार केलेल्या भ्‌२े स्ट!ीपच्या टेस्टच्या सहाय्याने करावी. सेप्टीक संडासचा वापर, कचर्‍याची योग्य विल्हेवाट यांसह स्वच्छतेसाठी प्रवृत्त करणे. जीवनविषयक आकडेवारीची संकलन व अहवाल सादरीकरण. आरोग्य/शिक्षण वर्तणुकीतील बदलासाठी संदेशवहन. राष्ट!ीय एडस नियंत्रण कार्यक्रमासह इतर राष्ट!ीय आरोग्य कार्यक्रम राबविणे. नेहमीच्या व तात्काळ उपचार सुविधा - या सेवा

  • जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्गात येतात त्यांना व जे रुग्ण उपकेंद्गावरुन अथवा अन्य ठिकाणांहून संदर्भसेवा दिल्याने येतात त्यांना या सेवा उपलब्ध व्हाव्यात. या सेवात खालील गोष्टींचा समावेश होतो.

उपचार देणे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्गात उपचार करणे शक्य नसलेल्या रुग्णांना संदर्भसेवा. रुग्णालयात दाखल करावायाची गरज आहे अशांना आंतररुग्ण उपचार देणे.

सद्यस्थितीत विविध दर्शकांचे जिल्हयातील दर खालीलप्रमाणे आहेत.

Not Compete

  1. गरोदर मातेला मिळणार्‍या प्रसुतीपूर्व सेवा :- ९८ टक्के
  2. प्रशिक्षित व्यक्तीने केलेली बाळंतपणे :- ९५ टक्के
  3. स्त्री- पूरुष प्रमाण (० ते ६ वर्षे) :- ८९५
  4. संरक्षित जोडपी प्रमाण :- ७४ टक्के
  • राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी :-
  1. राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम
  2. राष्ट्रीय आर.सी.एच कार्यक्रम
  3. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम
  4. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
  5. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
  6. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
  7. राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रम या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे जिल्हयात खालील संस्था कार्यरत आहेत.

या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे जिल्हयात खालील संस्था कार्यरत आहेत.

अं.क्र.योजनाकालावधीमाहिती 
1 रुग्ण कल्याण समिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सेवांच्या दक्ष व्यवस्थापनासाठी रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. रुग्ण कल्याण समिती ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केलेली संस्था असावी लागते. रत्नागिरी जिल्हामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर समित्यांना प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये रुग्ण कल्याण समिती निधी म्हणुन रु.100000/- अनुदान अनुज्ञेय आहे. उदिद्ष्टे : १)राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणीवर संनियंत्रण. २)विविध आरोग्य सेवांचे नियंत्रण. ३)रुग्णालयीन सेवेची गुणवत्ता राखणे. ४)रुग्णालयीन सेवांबाबत लोकांचा प्रतिसाद घेणे. ५)स्थानिक देणगीदारांचा सहभाग वाढवणे. ६)प्राप्त होणाऱ्या निधींचा रुग्ण सेवा दर्जा वाढविण्याकरीता उपयोग करणे. पहा
2 जिल्हा निधीतुन आर्थिक मदत देणेबाबतची योजना ) निरंक पहा
3 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम – ब) अंगणवाडी लाभार्थी तपासणी व उपचार कार्यक्रम  निरंक पहा
4 आयपीएचएस सर्व सरकारी आरोग्य केंद्राच्या सेवांच्या दर्जा हा आयपीएचएस अभियानाच्या काळातच गाठला जावा हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ध्येय आहे. या प्रक्रियेत प्रथम संदर्भ केंद्राइतकी सक्षम सेवा देणारे युनिट म्हणुन प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला विकसित केले जाणार आहे. ज्यामध्ये जोखमीच्या बाळंतपणासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध असतील. ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणत्या सेवा निश्चितपणे मिळतील व त्यासाठी कोणत्या किमान बाबी तिथे असतील हे आयपीएचएस मध्ये ठरेल. या किमान बाबी खालीलप्रमाणे. १)किमान वैदयकीय व सहाय्यक मनुष्यबळ २)आवश्यक साधने ३)औषधांची उपलब्धता ४)मुलभुत भौतिक सुविधा ५)जनआरोग्य हक्कांची सनद ६)दर्जा नियंत्रणासाठी आवश्यक गरजांची पुर्तता ७)आरोग्य सेवांचा दर्जा निश्चित करणे त्यासाठी स्टॅडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉल उपचार पक्रियेची प्रमाणित प्रणाली. पहा
5 पायाभुत सुविधा विकास कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभुत सुविधा विकास कक्ष स्थापन करणेबाबत शासन परिपत्रक, महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग शासन परिपत्रक क्र.एनआरएचएम 1007/प्रक्र9/ आरोग्य 7 मंत्रालय सार्वजनिक आरोग्याशी निगडीत विविध घटकांच्या संदर्भात केंद्र शासनाकडुन निधी उपलब्ध होत आहे. सर्व स्तरावरील आरोग्य केंद्राचे बांधकाम, सध्या अस्तिवात असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये सुधारणे इ.बाबींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन उपकेंद्रांच्या बांधकामामध्ये डिलिव्हरी रुमची व्यवस्था करण्यात येणार आहे जेणेकरुन उपकेंद्र ठिकाणी डिलिव्हरीची व्यवस्था झाल्याने स्थानिक लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल पहा
6 नियमित लसीकरण बळकटीकरण प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक लस टोचणी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 100 टक्के बालकांना गुणवत्तापुर्वक लसीकरण मिळणेसाठी एनएचएम अंतर्गत नियमित लसीकरण बळकटीकरण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. योजनेचे उदिद्ष्ट : १)लसीकरणामुळे येणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी करणे. २)प्रत्येक लाभार्थ्यीस योग्य वेळी देय लसीचा डोस देणे. ३)बालमृत्यु प्रमाण कमी करणे. योजनेचे स्वरुप : **लसीकरणाने संबंधित रोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी योग्य वेळ, योग्य अंतराने व नियमितपणे लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते. 1) मोबीलीटी सपोर्ट - प्रत्येक आरोग्य सेवा सत्राकरीता व्हॅक्सीन कॅरीयर, एडी सिरींज व इतर साहित्याची वाहतुक करणेकरीता रु.50/- अनुदान मंजुर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वाहन नाही अशा ठिकाणी सत्रात उपस्थित राहणाऱ्या आरोग्य सहाय्यक यांस रु.50/- रोखीने देय राहतील. 2) सहाय्यक गट - मुख्यालय सोडुन कार्यक्षेत्रात आरोग्य सेवा सत्राचे ठिकाणी सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे गटाला चहापाण्यासाठी रु.150/- अनुदान मंजुर आहे. पहा
7 अर्श कार्यक्रमांतर्गत मैत्री क्लिनीक किशोरवयीन मुलांमुलींमध्ये होणारे विविध आजार तसेच वयात येताना होणारे भावनिक, शारिरिक व लैगीक बदल व गैरसमजातुन होणारे विविध आजार त्याचबरोबर किशोरवयीन मुलींमध्ये मोठया प्रमाणात असणारा रक्तक्षय या सर्वांसाठी जिल्हामध्ये चार ठिकाणी मैत्री क्लिनीक स्थापन करुन त्यांना समुपदेशन, वैदयकीय सल्ला व औषधोपचार देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे पहा
8 राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम विकृती कुष्ठरुग्ण ग्रेड - 2 पुर्नरचनात्मक शस्त्रक्रियेसाठी अनुदान : बी. पी. एल. कार्डधारक विकृती असलेल्या पात्र कुष्ठरुग्णांना शासनामार्फत शस्त्रक्रिया झाल्यानंतर, रुग्णालयातून रुग्णांस घरी जाताना रु.5000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र) इतका मोबदला दिला जातो. त्याचप्रमाणे पुढील प्रत्येक फॉलोअपसाठी रु.1,500/- (अक्षरी रु. एक हजार पाचशे मात्र) याप्रमाणे दोन फॉलोअपकरिता रु.3000/- (अक्षरी रु. तीन हजार मात्र) इतके अनुदान दिले जाते. ही शस्त्रक्रिया रुग्णाच्या हाताची बोटे वाकडी, हात, पाय लुळा पडणे, डोळा बंद न होणे याकरिता सदरची शस्त्रक्रिया केली जाते. पहा
9 रोगाने पीडित असणाऱ्या ( हृदयरोग, किडणी, कॅन्सर ) 1) योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून (ह्दयरोग, किडनी सर्व प्रकारचे कॅन्सर) दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या जिल्हा परिषद निधीतून र. रु. 15,000/- आर्थिक मदत दिली जाते. 2) अटी व शर्ती :- 1) रुग्ण हा रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. 2) रुग्ण हा भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्र्य रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास प्राधान्य द्यावे. 3) रुग्ण दुर्धर रोगाने पिडीत असल्याबाबतचे प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 4) शासकीय रुग्णालय अगर शासन प्राधिकृत खाजगी रुग्णालयात झालेल्या उपचारांचे खर्चाचे देयक सादर करणे आवश्यक आहे. पहा
10 ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मुलभुत आरोग्य सुविधामध्ये सुधारणा करण्याबरोबरच परिसर स्वच्छता, पोषण व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याबाबींकडेही राष्ट्रीय आरोग्य अभियानांमध्ये लक्ष दिले जाते. यासाठी ग्रामस्तरा वरील ग्राम आरोग्य समिती व ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांचे विलिनीकरण करुन या विषयासाठी एकच समिती ग्राम आरोग्य व पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गठीत करावयाची आहे. याबाबतचे शासनाचे आदेश, समितीच्या कार्यकक्षा, कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचे परिपत्रक ग्रामस्तरावर देण्यात आलेले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हामध्ये समित्या गठीत झालेल्या आहेत. ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्घ्छता समिती गठीत करण्यात आल्यावर या समितीचे सध्या असलेले बँक खात फक्त पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रमासाठी वापरात ठेवावे, तर आरोग्य , महिला व बाल विकास कार्यक्रमासाठी स्वतंत्र बचत बँक खाते उघडयात यावे. हे स्वतंत्र बचत बँक खाते समितीचे अध्यक्ष व गावातील अंगणवाडी सेविका या दोघाच्या संयुक्त सहीने चालविण्यात यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांअंतर्गत आरोग्य तसेच पोषण कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त होणारा निधी या स्वतंत्र बचत खात्यामध्ये जमा करण्यात यावा. या खात्यामधील जमा खर्चाची नोंद आशा/ अंगणवाडी सेविका यांनी स्वतंत्र नोंदवहीद्वारे ठेवावी. जमाखर्चाची ही नोंदवही वेळोवळी ए.एन.एम./एम.पी.डब्ल्यु/ ग्रामपंचायतीने तपासावी व सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध ठेवावी. या निधीचा विनियोग करण्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागामार्फंत देण्यात आलेल्या/येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करणेत यावी. सदर योजनेसाठी प्रत्येक महसुली गावाला लोकसंख्येप्रमाणे दरवर्षी रु.10000/- प्रमाणे अनुदान उपलब्ध होत आहे . पहा
11 जननी सुरक्षा योजना केंद्र शासनाच्या राष्टीय आरोग्य अभियानअंतर्गत जननी सुरक्षा योजना एप्रिल 2005 पासुन कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेचे उदिद्ष्ट : १)जिल्हातील ग्रामीण व शहरी भागातील (मुख्यत: चाळी, झोपडपटटी व गलिच्छ वस्ती इ.) दारिद्रयरेषेखालील व अनुसुचित जाती, जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण वाढवणे. 2)मातामृत्यु व अर्भकमृत्युचे प्रमाण कमी करणे. 3)प्रसुतीपुर्व तपासण्या, नवजात बालकांची देखभाल, प्रसुतीपश्च्यात सेवा तसेच सुयोग्य संदर्भ सेवा व वाहनव्यवस्थेची तरतुद या सेवांची जोड देऊन प्रसुती सेवांचा दर्जा सुधारणे. लाभार्थी पात्रता : १)सदर लाभार्थी दारिद्रय रेषेखालील अथवा अनुसुचित जाती,जमातीचा असावा. २)12 आठवडयाच्या आत गरोदरपणाची नोंदणी होणे आवश्यक. 3)सदर योजनेचा लाभ प्रसुतीनंतर तात्काळ देण्यात येतो. 4)गरोदर मातेने प्रसुतीपुर्व सर्व सेवा घेणे आवश्यक आहे. मिळणारा लाभ: 1)ग्रामीण भागाकरीता बाळंतपण शासकीय ग्रामीण आरोग्य संस्थेत झाल्यास 700/- रुपये अनुदान देय राहील. 2)शहरी भागाकरीता बाळंतपण शासकीय ग्रामीण आरोग्य संस्थेत झाल्यास 600/- रुपये अनुदान देय राहील. 3)महिलेच्या गरोदरपणातील किंवा प्रसुती काळातील जोखमीमुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करावयाचे झाल्यास व त्यासाठी शासकीय रुग्णालयात तज्ञ वैदयकीय अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध नसल्यास खाजगी तज्ञ वैदयकीय अधिकाऱ्यांना त्यांची सेवा देण्यासाठी 1500/- रुपये मानधन किंवा शस्त्रक्रिया खाजगी मानांकित रुग्णालयात झाल्सास रु.1500/- अनुदान खाजगी रुग्णालयास देय राहील. पहा
12 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 06 या वयोगटातील अंगणवाडी बालकांची तपासणी वर्षातुन दोनदा व 6 ते 18 या वयोगटातील शालेय विदयार्थ्यांची तपासणी वर्षातुन एकदा राष्ट्रीय बाल स्वास्थ पथकाकडुन प्रत्यक्ष शाळेत जाऊन मुलांची तपासणी करण्यात येते. तसेच या तपासणी अंती गंभीर व दुर्धर आजारी मुलांवर पुढील उपचार व शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय व शासनाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये करण्यात येतात. सदरील कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग यांच्यासहकार्याने संयुक्तरित्या जिल्हात राबविण्यात येतो. पहा
13 उपकेंद्र बळकटीकरण योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडुन प्रत्येक उपकेंद्रास दरवर्षी 10,000/- रुपयांचे अनुदान दिले जाते. प्रत्येक उपकेंद्राच्या मुख्यालयी असलेल्या बँकेत (प्राधान्याने राष्ट्रीयकृत बँक) अथवा पोस्टात ए.एन.एम व स्थानिक सरपंच यांच्या नावाने संयुक्त खाते उघडुन त्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. सदरचे अनुदान हे केवळ जनतेच्या आरोग्य सुविधात वाढ करण्यासाठी खर्च करावयाचे आहे. परंतु अतिजोखमीच्या लाभार्थीला संदर्भ सेवेसाठी लागणारा खर्च सोडुन इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी खर्च करता येईल. या अनुदानातुन खालील बाबींसाठी खर्च करता येईल. १)स्थानिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक बाबी. २)उपकेंद्र इमारतीमध्ये तातडीच्या किरकोळ दुरुस्त्या उदा. नळ दुरुस्ती, किरकोळ म्हणजे रु.1000/- पर्यंत छप्पर दुरुस्ती. ३)अतिजोखमीच्या व्यक्तींना तातडीच्यावेळी संदर्भ सेवा देण्यासाठी. ४)रुग्णांच्या सोईसाठी सतरंजी, खुर्च्या, टेबल, बाकडे इत्यादी. ५)उपकेंद्राच्या इमारतीच्या सभोवताली तसेच आसपास स्वच्छता राखण्यासाठी याकरीता खर्च करता येईल. पहा
14 अबंध निधी व देखभाल दुरुस्ती निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्व प्रा.आ.केंद्र पुर्णपणे कार्यरत करणेसाठी प्रतिवर्षी रु.25000/- प्रत्येकी प्रा.आ.केंद्राना अंबध निधीमधुन देण्यात येणार असुन, प्रा.आ.केंद्राच्या किरकोळ दुरुस्तीसाठी प्रतिवर्षी रु.50000/- प्रत्येकी देण्यात येत आहेत. अंबध निधी प्रामुख्याने रुग्णांना आरोग्यविषयक सेवा पुरविण्यासाठी खर्च करावयाचा आहे. ज्यामध्ये प्रा.आ.केंद्राना पडदे, विदयुत उपकरणे, बी.पी.ॲपरेटस, डिलिव्हरी टेबल, स्टेथोस्कोप, मातांसाठी व बालकांसाठी वेईंग मशीन, तांबी इ. गोष्टी खरेदी करणेसाठी तसेच अतितातडीच्या रुग्णांना संदर्भिय सेवा देण्यासाठी , परिसर स्वच्छता देण्यासाठी तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी वरील निधी प्राप्त झालेला अुसन प्रा.आ.केंद्राना वितरीत करण्यात येतो. सदर अंबंध निधी व देखभाल दुरुस्ती निधी चा विनियोग रुग्ण कल्याण समितीच्या नियंत्रणाखाली करावयाचा आहे. पहा
15 टेलिमेडिसीन सेंटर या सेंटरमधुन अतिगंभीर रुग्णांवर उपचार करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे,मुंबई या ठिकाणाच्या तज्ञ वैदयकीय अधिकाऱ्यांची संगणक प्रणालीद्वारे मदत घेण्यात येते. तसेच रुग्णांच्या सदयस्थितीची माहिती त्यांना संगणकाद्वारे पाठऊन त्यांचा सल्ला घेऊन सुयोग्य असे उपचार रुग्णांवर करुन रुग्णांचे प्राण वाचविले जातात. सदरील कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय येथे स्थापन करुन कार्यान्वित करण्यात आलेला आहे. पहा
16 राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम छोटे कुटुंब व सुखी कुटुंब या संकल्पनेची महती 15 ते 49 वयोगटातील सर्व विवाहीत जोडप्यांना सविस्तरपणे पटवून देवुन सदर कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन, या कार्यक्रमांतर्गत शासकीय संस्थेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील स्त्री लाभार्थीला रु. 600/- तसेच बी. पी. एल., एस. सी., एस. टी. प्रवर्गातील लाभार्थीला रक्कम रुपये 950/- व कुटुंब नियोजन पुरुष शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थीला रक्कम रुपये 1500/- अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र शासन प्रोत्साहन अनुदान पुरुष शस्त्रक्रियेसाठी रक्कम रुपये 351/- देण्यात येते. पहा
17 सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना :- एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीला रक्कम रुपये 2000/- रोख व मुलीच्या नावे रक्कम रुपये 8000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपात असे एकूण र. रु. 10,000/- देण्यात येतात. दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीला रक्कम रुपये 2000/- व मुलींच्या नावे प्रत्येकी रु. 4000/- याप्रमाणे एकूण रु. 8000/- रकमेची राष्ट्रीय बचतप्रमाणपत्र स्वरुपात असे एकूण र. रु. 10,000/- देण्यात येतात. पहा
18 महात्मा फुले आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णांना एकूण 996 आजारांवर उपचार मोफत मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यामधील पंधरा रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये श्री रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी, परकार हॉस्पिटल रत्नागिरी, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी, पंडित दीनदयाळ लांजा, वालावलकर हॉस्पिटल डेरवण, लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण, एस. एम. एस. हॉस्पिटल चिपळूण, अपरांत हॉस्पिटल चिपळूण याशिवाय शासकीय रुग्णालय पाली, राजापूर, कामथे, संगमेश्वर, कळंबणी व दापोली यांचा समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णांना एकूण 996 आजारांवर उपचार मोफत मिळतो. तसेच सुरवातीच्या काळात ही योजना फक्त पिवळ्या रेशनकार्ड केशरी रेशनकार्ड अंत्योदय, अन्नपूर्णा रेशनकार्ड अश्या कार्डधारक वर्गातील लोकांसाठी होती. पण कोविडच्या पेंडमिक सिच्युएशनमुळे ती सर्व नागरिकांसाठी म्हणजे शुभ्र शिधा कार्ड धारकांसाठी ही योजना सध्या चालू आहे. आणि सर्व वर्गातील रुग्णांना 31 जानेवारी 2021 पर्यंत याचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी आपण या टोल फ्री नंबर वरती कॉल करू शकता. टोल फ्री क्रमांक - १८००२३३२२००/१५५३८८. पहा
19 आयुष (आयुर्वेद) महाराष्ट्र राज्यामध्ये पारंपारिक चिकित्सा पध्दतींचा जनतेमध्ये मोठया प्रमाणात स्विकार केला गेला आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आजार टाळण्यासाठी व उपचारासाठी आयुष पद्धतीचा वापर केला जातो. शारिरिक व मानसिक आजार दुर ठेवण्यासाठी व वैयक्तिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आयुष पदधतींना पर्याय नाही हे सिद्ध झाले आहे. आयुष पध्दतींना पुर्नजीवित करणेसाठी त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानव्दारे सर्व जिल्हा रुग्णालय व काही अन्य शासकीय रुग्णांलयामध्ये आयुष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. शासकीय ॲलोपॅथी रुग्णालयांमध्ये आयुष सुविधा उपलब्ध केली जाते. यामध्ये आर्युवेदिक, निर्सगोउपचार, होमिओपॅथिक, युनानी उपचार पध्दती, योगा,सिध्दा यांचा समावेश केला जातो. यासर्व उपचार पध्दतीचे तज्ञ वैदयकीय अधिकारी जिल्हा शासकीय रुग्णालय व काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. पहा
20 राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय किटकजन्य रोग नियं'त्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापाच्या संशयित रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर त्वरीत मोफत उपचार केले जातात. तसेच त्याच्या सहवासितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येतात. हिवतापाचे त्वरीत निदान करणेसाठी हिवताप रॅपिड डायग्नोस्टिक किट चा वापर करण्यात येतो. जिल्हा स्तरावर 2 शिघ्रपथक तयार करण्यात येतात. जेणेकरुन उद्रेकाच्या ठिकाणी तातडीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात हे शिघ्र पथक मदत करतात. अतिजोखमीच्या भागात किटकनाशक फवारणी करण्यात येते व लोकांना प्रतिबंधात्मक उपचार दिले जोतात. डासोत्पत्ती स्थानांवर नियंत्रणासाठी गप्पी मासे यांचा उपयोग केला जातो. डासोत्पत्ती स्थाने नष्ट केली जातात व काही डासोत्पत्ती स्थानांमध्ये टेमिफॉस नावाच्या अळीनाशकाचा उपयोग केला जातो. किटकजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी मुख्यत: डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक असल्यामूळे उत्पत्ती रोखणेकरीता विविध उपाययोजना करण्यात येतात. नियमित गृहभेटीच्या वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत 100 टक्के कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात येते. डास आळी आढळूण आलेले दुषित कंटेनर रिकामी करण्यात येतात. सन 2025 पर्यंत रत्नागिरी जिल्हा हिवताप मुक्त करण्याच्या दुष्टीने सध्या उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. पहा
21 आशा स्वयंसेविका योजना  सदर योजना 2005 पासुन कार्यान्वीत आहे. आशा स्वयंसेविकांची निवड करताना प्रती 1000 ते 1500 लोकसंख्येमागे करण्यात येते. निवड प्रक्रिया प्रथम ग्राम स्तरावर अंगणवाडी सेविका, एएनएम, गटप्रवर्तक, ग्रामपंचायत नोटीस बोर्ड वर याबाबत सुचना देण्यात येते. ग्रामसभेच्या दिवशी आलेल्या अर्जाचे वाचन करुन आशा स्वयंसेविकांची निवड करुन सदर निवड झालेल्या महिलेचा प्रस्ताव प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सादर करण्यात येतो. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडुन सदर महिलेला नियुक्ती देण्यात येते. सदर आशा स्वयंसेविकांची इंडक्शन प्रशिक्षण 8 दिवस, एचबीएनसी 1 ते 4 टप्पा प्रशिक्षण प्रत्येक टप्पा 5 दिवस, एनसीडी 5 दिवस याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येते. आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर आपल्या कार्यक्षेत्रातील लाभार्थीपर्यंत आरोग्य विषयक योजनांची माहिती व लाभ मिळवुन देण्यासाठी प्रवृत्त करणे. आशा स्वयंसेविकांनी राज्यस्तरावरुन मंजुर करुन दिलेल्या हेडवर काम करण्यात यावे याबाबत सुचना आहेत. आशा स्वयंसेविका यांना कामावर आधारीत मोबदला देण्यात येतो. पहा
22 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. प्रामुख्याने फुफ्फूस व इतर कोणत्याही अवयवाचा क्षयरोग होऊ शकतो. आपल्या देशात साधारणतः 40% हून अधिक लोक क्षयरोगाने सांसर्गिक आहेत. त्यापैकी या सर्वांना क्षयरोग झालेला नाही. यामध्ये आयुष्यात टीबी होण्याची शक्यता साधारण 10% इतकी असते. आपल्या देशात दररोज 6000 हुन अधिक लोकांना क्षयरोग होतो. तसेच दर 2.5 मिनीटाला एक रुग्ण क्षयरोगाने मरण पावतो. आपल्या देशात दरवर्षी 28.4 लाखाहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळून येतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. वर्षभरात 1 लाख लोकसंख्येत सुमारे 204 आढळून येतात. सदर क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणेचे विविध स्तर केलेले आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हा क्षयरोग केंद्र आणि तालुकास्तरावर क्षयरोग उपचार पथक कार्यरत असते. रत्नागिरी जिल्ह्यात 'जिल्हा रुग्णालय' येथे "जिल्हा क्षयरोग केंद्र" कार्यरत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये नऊ ठिकाणी क्षयरोग पथके कार्यरत आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्रा. आ. केंद्र येथे क्षयरोगावरील औषधोपचार मोफत दिला जातो. निदान प्रकारांमध्ये DSTB निदान करण्यासाठी काही प्रा. आ. केंद्र स्तरावर निर्देशीत सूक्ष्मदर्शी केंद्र तसेच DRTB निदानासाठी जिल्हा स्तरावर "जिल्हा रुग्णालय "व "बी. के. एल. वालावलकर " येथे CBNAAT तपासणीची मोफत सोय केलेली आहे. निदान झालेल्या सर्व क्षय रुग्णांना निक्षय पोषण योजनेद्वारे उपचार सुरू असेपर्यंत दर महिन्याला रुपये 500/- पोषण आहारासाठी भत्ता दिला जातो. क्षयरुग्णांना आशांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने (समाजसेवक/स्वयंसेवक) देखरेखीखाली औषधोपचार नियमितपणे दिल्यास क्षयरोगाच्या प्रकारानुसार व उपचाराच्या कालावधीनुसार मानधन देण्यात येते. त्यामध्ये डीएसटीबी रुग्णांना उपचार पूर्ण दिल्यानंतर रुपये 1000/- व डीआरटीबी रुग्णांना उपचार पूर्ण दिल्यास रुपये 5000/- इतके मानधन दिले जाते. नवीन रुग्ण शोधल्यास रु.500/- इतके मानधन दिले जाते. त्याचप्रमाणे खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी नवीन क्षयरुग्ण नोंदणी केल्यानंतर प्रत्येक रुग्णामागे रु. 500/- व उपचार पूर्ण केल्यानंतर रु.500/- असे मानधन दिले जाते. तसेच खाजगी प्रयोगशाळा व औषधालये यांना नवीन क्षयरुग्णांविषयी माहिती देणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. व अशी क्षय रुग्णांची माहिती दिल्यानंतर प्रत्येक क्षय रुग्णामागे रु.500/- इतके मानधन दिले जाते. पहा
23 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना  भारतातील दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरिल अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसुतीनंतर शारिरिक क्षमता नसतानाही मजूरीसाठी तात्काळ काम करावे लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिला व बालके कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. त्या अनुषंगाने दिनांक 21-11-2017 रोजी झालेल्या मा.मंत्री मंडळाच्या बैठकित मान्यता घेऊन या योजनेचा शासन निर्णय दिनांक 08-12-2017 रोजी निर्गमित करण्यात आला असून, केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 01 जानेवारी 2021 पासून कार्यान्वीत केली आहे. सदर योजना केंद्र पूरस्कृत असून या योजनेमध्ये शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. योजनेचे उद्दिष्ट :- 1- माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. 2- जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट येऊन तो नियंत्रणात रहावा. 3- प्रसुतीपूर्व प्रसुतीपश्चात महिलेला आपली बुडीत मजूरी मिळावी यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना कार्यान्वीत केली आहे. योजनेचे निकष :- शासनाने अधिसुचित केलेल्या संस्थेत शासकिय रुग्णालये नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तिच्या पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत एकदाच लाभ अनुज्ञेय असून, लाभाची र.रु.5000/- इतकी आहे. वेतनासह मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय रहाणार नाही. मात्र लाभार्थी गर्भवती महिलेस खाली दर्शविल्याप्रमाणे रु.5000/- बँक सलग्न खात्यात किंवा पोस्ट खात्यातDBT Through PFMS व्दारे समाजातील सर्व स्तरातील मातांना तीन टप्प्यांत जमा केली जाते. पहिला हप्ता :- 1000/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत शासकिय संस्थेत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होतो. दुसरा हप्ता :- 2000/- किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने तथा 180 दिवस पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात. तिसरा हप्ता :- 2000/-प्रसुतीनंतर बाळाचे 14 आठवडयापर्यंतचे सर्व लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात. आवश्यक कागदपत्र :- लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, आधार सल्ग्न बँक किंवा पोस्ट खाते, माता व बाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र. ग्रामीण व शहरी क्षेत्र :- आरोग्य सेविका व आशा कार्यकर्ती पात्र लाभार्थींना विना शुल्क विहित नमुन्यातील अर्ज देऊन, प्रा.आ.केंद्र व नागरी प्रा.आ.केंद्रामार्फत तालुका आरोग्य अधिकारी /मुख्याधिकारी यांचेकडे सादर करुन विहित संकेत स्थळी लाभार्थ्यांची माहिती भरण्यात येते व राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीव्दारे थेट लाभ दिला जातो. सदर योजना उत्तमरितीने राबविणेसाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच आरोग्य संस्थेच्या परिसरामध्ये पोस्टर्स, बॅनर्स, वर्तमानपत्रे व रेडिओ प्रक्षेपणाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा यांच्या सहकार्याने या योजनेची उद्यिष्टपूर्ती करण्यात आली. सद्यस्थित रत्नागिरी जिल्हयामध्ये राज्यसतरावरुन देण्यात आलेले मातांचे 29606 उद्यिष्टांपेक्षा एकूण 30355 मातांना एकूण रु.12,89,84,000. लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. जिल्हयात कोविड साथीच्या लॉकडाऊन काळातही व नागरिकांचा तसेच पात्र मातांचा उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली. पहा
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 आरोग्य विभाग राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम म्हणजे काय ?छोटे कुटुंब व सुखी कुटुंब या संकल्पनेची महती १५ ते ४९ वयोगटातील सर्व विवाहित जोडप्यांना सविस्तरपने पटवून देवून सदर कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून, या कार्यक्रमांतर्गत शासकीय संस्थेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील स्त्री लाभार्थीला रु. ६००/- तसेच बी. पी. एल. , एस. सी., एस. टी. प्रवर्गातील लाभार्थीला रक्कम रुपये ९५०/- व कुटुंब नियोजन पुरुष शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थीला रक्कम रुपये १५००/- अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र शासन प्रोत्साहन अनुदान पुरुष शस्त्रक्रियेसाठी रक्कम रुपये ३५१/- देण्यात येते.
2 आरोग्य विभाग सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना म्हणजे काय ?एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीला रक्कम रुपये २०००/- रोख व मुलीच्या नावे रक्कम रुपये ८०००/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपात असे एकूण रक्कम रुपये १०,०००/- देण्यात येतात. दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीला रक्कम रुपये २०००/- व मुलींच्या नावे प्रत्येकी रु. ४०००/- याप्रमाणे एकूण रु. ८०००/- रकमेची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपात असे एकूण रक्कम रु. १०,०००/- देण्यात येतात.
3 आरोग्य विभाग अर्श कार्यक्रमांतर्गत मैत्री क्लिनीक म्हणजे काय?किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणारे विविध आजार तसेच वयात येताना होणारे भावनिक, शारिरिक व लैंगीक बदल व गैरसमजातुन होणारे विविध आजार त्याचबरोबर किशोरवयीन मुलींमध्ये मोठया प्रमाणात असणारा रक्तक्षय या सर्वांसाठी जिल्हामध्ये चार ठिकाणी मैत्री क्लिनीक स्थापन करण्यात आली आहे. त्याव्दारे त्यांना समुपदेशन, वैदयकीय सल्ला व औषधोपचार देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
4 आरोग्य विभाग राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम म्हणजे काय?या कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 06 या वयोगटातील अंगणवाडी बालकांची तपासणी वर्षातुन दोनदा व 6 ते 18 या वयोगटातील शालेय विदयार्थ्यांची तपासणी वर्षातुन एकदा राष्ट्रीय बाल स्वास्थ पथकाकडुन प्रत्यक्ष शाळेत जाऊन मुलांची तपासणी करण्यात येते. तसेच या तपासणी अंती गंभीर व दुर्धर आजारी मुलांवर पुढील उपचार व शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय व शासनाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये करण्यात येतात. सदरील कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने संयुक्तरित्या जिल्हयात राबविण्यात येतो.
5 आरोग्य विभाग प्रधानमंत्री मातृ वंदन योजना म्हणजे काय?प्रधानमंत्री मातृ वंदन योजना - प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस रु.5000/-एवढी रक्कम आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्‍ट ऑफीस मधील खात्यात (DBT) व्दारे खालील तीन टप्‍प्यात जमा केली जाते. 1) पहिला हप्ता रु 1000/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासुन 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर 1 ला हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. 2) दुसरा हप्ता रु 2000/- किमान एकदा प्रसवपुर्व तपासणी केल्यास गर्भ धारणेचे सहा महिने पुर्ण झाल्यानंतर 2 रा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. 3) तिसरा हप्ता रु 2000/- प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म्‍ नोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डिपीटी आणि हिपॅटॅटीस बी वा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पाहिला खुराक दिल्यानंतर 3 रा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो.
6 आरोग्य विभाग प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान म्हणजे काय?प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या‍ तिमाहितील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करुन दयावयाच्या आहेत. यामध्ये प्रयोगशाळा चाचण्या, सोनाग्राफी तपासणी, तज्ञांव्दारे आरोग्य तपासणी, अतिजोखमिच्या मातांचे निदान, समुपदेशन व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या 09 तारखेस हे अभियान शासकिय संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. हे अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी विविध विभागाचे व खाजगी वैदयकिय व्यवसाईकांचे योगदान घेण्यात येत आहे.
7 आरोग्य विभाग रोगाने पीडित असणाऱ्या ( हृदयरोग, किडणी, कॅन्सर) म्हणजे काय?1) योजनेचे स्वरुप:- जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून (ह्दयरोग, किडनी सर्व प्रकारचे कॅन्सर) दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्यांना जिल्हा परिषद निधीतून र.रु. 15,000/- आर्थिक मदत दिली जाते. अटी व शर्ती:- 1) रुग्ण हा रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. 2) रुग्ण हा भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्र्य रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास प्राधान्य द्यावे. 3) रुग्ण दुर्धर रोगाने पिडीत असल्याबाबतचे प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 4) शासकीय रुग्णालय अगर शासन प्राधिकृत खाजगी रुग्णालयात झालेल्या उपचारांचे खर्चाचे देयक सादर करणे आवश्यक आहे.
8 आरोग्य विभाग आशा स्वयंसेविका योजना म्हणजे काय?सदर योजना 2005 पासुन कार्यान्वीत आहे. आशा स्वयंसेविकांची निवड करताना प्रती 1000 ते 1500 लोकसंख्येमागे करण्यात येते. निवड प्रक्रिया प्रथम ग्राम स्तरावर अंगणवाडी सेविका, एएनएम, गटप्रवर्तक, ग्रामपंचायत नोटीस बोर्ड वर याबाबत सुचना देण्यात येते. ग्रामसभेच्या दिवशी आलेल्या अर्जाचे वाचन करुन आशा स्वयंसेविकांची निवड करुन सदर निवड झालेल्या महिलेचा प्रस्ताव प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सादर करण्यात येतो. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडुन सदर महिलेला नियुक्ती देण्यात येते. सदर आशा स्वयंसेविकांची इंडक्शन प्रशिक्षण 8 दिवस, एचबीएनसी 1 ते 4 टप्पा प्रशिक्षण प्रत्येक टप्पा 5 दिवस, एनसीडी 5 दिवस याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येते. आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर आपल्या कार्यक्षेत्रातील लाभार्थीपर्यंत आरोग्य विषयक योजनांची माहिती व लाभ मिळवुन देण्यासाठी प्रवृत्त करणे. आशा स्वयंसेविकांनी राज्यस्तरावरुन मंजुर करुन दिलेल्या हेडवर काम करण्यात यावे याबाबत सुचना आहेत. आशा स्वयंसेविका यांना कामावर आधारीत मोबदला देण्यात येतो.
9 आरोग्य विभाग आपत्का लीन वैदयकीय सेवा (108) म्हणजे काय?आपत्कालीन वैदयकीय सेवा प्रकल्पांतर्गत गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना सुसज्ज्‍ा रुग्ण्वाहीकेत प्राथमिक उपचार करुन रुग्णास नजीकच्या रुग्ण्‍ालयामध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्याबाबतची ही योजना आहे. यामध्ये रस्त्यावरील अपघात, सर्व गंभीर स्वरुपाचे आजाराचे रुग्ण्‍, बांळतपणातील गुंतागुंतीचे रुग्ण, नवजात अर्भकाशी संबधित आजार, नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, गंभीर आजारामध्ये हदयरुग्ण, सर्पदंश, अपघात, विषबाधा, श्वसोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदुशी संबधित गंभीर आजार इत्यादींचा समावेश असतो. 1) सदर सेवा ही टोल फ्री नंबर 108 मार्फंत कुठल्याही मोबाईल, लँडलाईन फोंनदवारे उपलब्ध करुन घेता येते. तसेच ही सेवा संपुर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिली जाते. 2)रुग्णवाहिकांमध्ये उपचारासाठी प्रशिक्षित वैदयकीय अधिकारी व प्रशिक्षित वाहन चालक तैनात असतात. 3)24 तास तातडीची रुग्णालय पुर्व व रुग्णालयीन वैदयकीय सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता शासकीय व खाजगी रुग्णालयांबरोबर समन्वय करण्यात येतो.
10 आरोग्य विभाग महात्मा फुले आरोग्य योजना म्हणजे काय?महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णांना एकूण 996 आजारांवर उपचार मोफत मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यामधील पंधरा रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये श्री रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी, परकार हॉस्पिटल रत्नागिरी, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी, पंडित दीनदयाळ लांजा, वालावलकर हॉस्पिटल डेरवण, लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण, एस. एम. एस. हॉस्पिटल चिपळूण, अपरांत हॉस्पिटल चिपळूण याशिवाय शासकीय रुग्णालय पाली, राजापूर, कामथे, संगमेश्वर, कळंबणी व दापोली यांचा समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णांना एकूण 996 आजारांवर उपचार मोफत मिळतो. तसेच सुरवातीच्या काळात ही योजना फक्त पिवळ्या रेशनकार्ड केशरी रेशनकार्ड अंत्योदय, अन्नपूर्णा रेशनकार्ड अश्या कार्डधारक वर्गातील लोकांसाठी होती. पण कोविडच्या पेंडमिक सिच्युएशनमुळे ती सर्व नागरिकांसाठी म्हणजे शुभ्र शिधा कार्ड धारकांसाठी ही योजना सध्या चालू आहे. आणि सर्व वर्गातील रुग्णांना 31 जानेवारी 2021 पर्यंत याचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी आपण या टोल फ्री नंबर वरती कॉल करू शकता. टोल फ्री क्रमांक - १८००२३३२२००/१५५३८८.
11 आरोग्य विभाग राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम म्हणजे काय?विकृती कुष्ठरुग्ण ग्रेड - 2 पुर्नरचनात्मक शस्त्रक्रियेसाठी अनुदान : बी. पी. एल. कार्डधारक विकृती असलेल्या पात्र कुष्ठरुग्णांना शासनामार्फत शस्त्रक्रिया झाल्यानंतर, रुग्णालयातून रुग्णांस घरी जाताना रु.5000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र) इतका मोबदला दिला जातो. त्याचप्रमाणे पुढील प्रत्येक फॉलोअपसाठी रु.1,500/- (अक्षरी रु. एक हजार पाचशे मात्र) याप्रमाणे दोन फॉलोअपकरिता रु.3000/- (अक्षरी रु. तीन हजार मात्र) इतके अनुदान दिले जाते. ही शस्त्रक्रिया रुग्णाच्या हाताची बोटे वाकडी, हात, पाय लुळा पडणे, डोळा बंद न होणे याकरिता सदरची शस्त्रक्रिया केली जाते.
12 आरोग्य विभाग राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम म्हणजे काय? क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. प्रामुख्याने फुफ्फूस व इतर कोणत्याही अवयवाचा क्षयरोग होऊ शकतो. आपल्या देशात साधारणतः 40% हून अधिक लोक क्षयरोगाने सांसर्गिक आहेत. त्यापैकी या सर्वांना क्षयरोग झालेला नाही. यामध्ये आयुष्यात टीबी होण्याची शक्यता साधारण 10% इतकी असते. आपल्या देशात दररोज 6000 हुन अधिक लोकांना क्षयरोग होतो. तसेच दर 2.5 मिनीटाला एक रुग्ण क्षयरोगाने मरण पावतो. आपल्या देशात दरवर्षी 28.4 लाखाहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळून येतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. वर्षभरात 1 लाख लोकसंख्येत सुमारे 204 आढळून येतात. सदर क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणेचे विविध स्तर केलेले आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हा क्षयरोग केंद्र आणि तालुकास्तरावर क्षयरोग उपचार पथक कार्यरत असते. रत्नागिरी जिल्ह्यात 'जिल्हा रुग्णालय' येथे "जिल्हा क्षयरोग केंद्र" कार्यरत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये नऊ ठिकाणी क्षयरोग पथके कार्यरत आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्रा. आ. केंद्र येथे क्षयरोगावरील औषधोपचार मोफत दिला जातो. निदान प्रकारांमध्ये DSTB निदान करण्यासाठी काही प्रा. आ. केंद्र स्तरावर निर्देशीत सूक्ष्मदर्शी केंद्र तसेच DRTB निदानासाठी जिल्हा स्तरावर "जिल्हा रुग्णालय "व "बी. के. एल. वालावलकर " येथे CBNAAT तपासणीची मोफत सोय केलेली आहे. निदान झालेल्या सर्व क्षय रुग्णांना निक्षय पोषण योजनेद्वारे उपचार सुरू असेपर्यंत दर महिन्याला रुपये 500/- पोषण आहारासाठी भत्ता दिला जातो. क्षयरुग्णांना आशांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने (समाजसेवक/स्वयंसेवक) देखरेखीखाली औषधोपचार नियमितपणे दिल्यास क्षयरोगाच्या प्रकारानुसार व उपचाराच्या कालावधीनुसार मानधन देण्यात येते. त्यामध्ये डीएसटीबी रुग्णांना उपचार पूर्ण दिल्यानंतर रुपये 1000/- व डीआरटीबी रुग्णांना उपचार पूर्ण दिल्यास रुपये 5000/- इतके मानधन दिले जाते. नवीन रुग्ण शोधल्यास रु.500/- इतके मानधन दिले जाते. त्याचप्रमाणे खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी नवीन क्षयरुग्ण नोंदणी केल्यानंतर प्रत्येक रुग्णामागे रु. 500/- व उपचार पूर्ण केल्यानंतर रु.500/- असे मानधन दिले जाते. तसेच खाजगी प्रयोगशाळा व औषधालये यांना नवीन क्षयरुग्णांविषयी माहिती देणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. व अशी क्षय रुग्णांची माहिती दिल्यानंतर प्रत्येक क्षय रुग्णामागे रु.500/- इतके मानधन दिले जाते.
13 आरोग्य विभाग आपत्कालीन वैदयकीय सेवा (102) म्हणजे काय?सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालयातुन गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या गरोदर महिलांना व बालकांना 102 या रुग्ण वाहिकेतून मोफत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले जाते. व जिल्हा सामान्य रुग्णालयातुन त्या बाळंतपण झालेल्या महिलांना व बालकांना त्यांच्या घरी मोफत सोडले जाते.
14 आरोग्य विभाग पायाभुत सुविधा विकास कक्ष म्हणजे काय?राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभुत सुविधा विकास कक्ष स्थापन करणेबाबत शासन परिपत्रक, महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग शासन परिपत्रक क्र.एनआरएचएम 1007/प्रक्र9/ आरोग्य 7 मंत्रालय सार्वजनिक आरोग्याशी निगडीत विविध घटकांच्या संदर्भात केंद्र शासनाकडुन निधी उपलब्ध होत आहे. सर्व स्तरावरील आरोग्य केंद्राचे बांधकाम, सध्या अस्तिवात असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा करणे इ.बाबींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन उपकेंद्रांच्या बांधकामामध्ये डिलिव्हरी रुमची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरुन उपकेंद्र ठिकाणी डिलिव्हरीची व्यवस्था झाल्याने स्थानिक लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.
15 आरोग्य विभाग जिल्हा निधीतुन आर्थिक मदत देणेबाबतची योजना म्हणजे काय?योजनेचे स्वरुप:- जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून (ह्दयरोग, किडनी सर्व प्रकारचे कॅन्सर) दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या जिल्हा परिषद निधीतून र. रु. 15,000/- आर्थिक मदत दिली जाते. अटी व शर्ती:- 1) रुग्ण हा रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. 2) रुग्ण हा भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्र रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास प्राधान्य द्यावे. 3) रुग्ण दुर्धर रोगाने पिडीत असल्याबाबतचे प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 4) शासकीय रुग्णालय अगर शासन प्राधिकृत खाजगी रुग्णालयात झालेल्या उपचारांचे खर्चाचे देयक सादर करणे आवश्यक आहे.
16 आरोग्य विभाग आयुष (आयुर्वेद) म्हणजे काय?महाराष्ट्र राज्यामध्ये पारंपारिक चिकित्सा पध्दतींचा जनतेमध्ये मोठया प्रमाणात स्विकार केला गेला आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आजार टाळण्यासाठी व उपचारासाठी आयुष पद्धतीचा वापर केला जातो. शारिरिक व मानसिक आजार दुर ठेवण्यासाठी व वैयक्तिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आयुष पदधतींना पर्याय नाही हे सिद्ध झाले आहे. आयुष पध्दतींना पुर्नजीवित करणेसाठी त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानव्दारे सर्व जिल्हा रुग्णालय व काही अन्य शासकीय रुग्णांलयामध्ये आयुष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. शासकीय ॲलोपॅथी रुग्णालयांमध्ये आयुष सुविधा उपलब्ध केली जाते. यामध्ये आर्युवेदिक, निर्सगोउपचार, होमिओपॅथिक, युनानी उपचार पध्दती, योगा,सिध्दा यांचा समावेश केला जातो. यासर्व उपचार पध्दतीचे तज्ञ वैदयकीय अधिकारी जिल्हा शासकीय रुग्णालय व काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत.
17 आरोग्य विभाग राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजे काय?राष्ट्रीय किटकजन्य रोग नियं'त्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापाच्या संशयित रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर त्वरीत मोफत उपचार केले जातात. तसेच त्याच्या सहवासितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येतात. हिवतापाचे त्वरीत निदान करणेसाठी हिवताप रॅपिड डायग्नोस्टिक किट चा वापर करण्यात येतो. जिल्हा स्तरावर 2 शिघ्रपथक तयार करण्यात येतात. जेणेकरुन उद्रेकाच्या ठिकाणी तातडीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात हे शिघ्र पथक मदत करतात. अतिजोखमीच्या भागात किटकनाशक फवारणी करण्यात येते व लोकांना प्रतिबंधात्मक उपचार दिले जोतात. डासोत्पत्ती स्थानांवर नियंत्रणासाठी गप्पी मासे यांचा उपयोग केला जातो. डासोत्पत्ती स्थाने नष्ट केली जातात व काही डासोत्पत्ती स्थानांमध्ये टेमिफॉस नावाच्या अळीनाशकाचा उपयोग केला जातो. किटकजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी मुख्यत: डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक असल्यामूळे उत्पत्ती रोखणेकरीता विविध उपाययोजना करण्यात येतात. नियमित गृहभेटीच्या वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत 100 टक्के कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात येते. डास आळी आढळूण आलेले दुषित कंटेनर रिकामी करण्यात येतात. सन 2025 पर्यंत रत्नागिरी जिल्हा हिवताप मुक्त करण्याच्या दुष्टीने सध्या उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.
18 आरोग्य विभाग दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या (हृदयरोग, किडनी, कॅन्सर) जिल्हा परिषद निधीतून आर्थिक मदत देणेबाबतची योजना म्हणजे काय?१) योजनेचे स्वरूप :- जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून (हृदयरोग, किडनी सर्व प्रकारचे कॅन्सर ) दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या जिल्हा परिषद निधीतून रक्कम रु. १५,०००/- आर्थिक मदत दिली जाते. २) अटी व शर्ती :- १) रुग्ण हा रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. २) रुग्ण हा भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्र्य रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास प्राधान्य द्यावे. ३) रुग्ण दुर्धर रोगाने पिडीत असल्याबाबतचे प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ४) शासकीय रुग्णालय अगर शासन प्राधिकृत खाजगी रुग्णालयात झालेल्या उपचारांचे खर्चाचे देयक सादर करणे आवश्यक आहे.
19 आरोग्य विभाग राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम म्हणजे काय ?विकृत कुष्ठरुग्ण ग्रेड -२ पुर्नरचनात्मक शस्त्रक्रियेसाठी अनुदान बी. पी. एल. कार्डधारक विकृती असलेल्या पात्र कुष्ठरुग्णांना शासनामार्फत शस्त्रक्रिया झाल्यानंतर, रुग्णालयातून रुग्णास घरी जाताना रक्कम रु. ५०००/- ( अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र ) इतका मोबदला दिला जातो. त्याचप्रमाणे पुढील प्रत्येक फॉलोअपसाठी रक्कम रु. १,५००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार पाचशे मात्र ) याप्रमाणे दोन फॉलोअपकरिता रक्कम रु. ३०००/- ( अक्षरी रक्कम रु. तीन हजार मात्र ) इतके अनुदान दिले जाते. ही शस्त्रकिया रुग्णाच्या हाताची बोटे वाकडी, हात, पाय लुळा पडणे, डोळा बंद न होणे याकरिता सदरची शस्त्रक्रिया केली जाते.
20 आरोग्य विभाग नियमित लसीकरण बळकटीकरण म्हणजे काय ?प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमाअंतर्गत सार्वत्रिक लस टोचणी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. या कार्यक्रमाअंतर्गत १०० टक्के बालकांना गुणवत्तापुर्वक लसीकरण मिळणेसाठी एनआरएचएम अंतर्गत नियमित लसीकरण बळकटीकरण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. योजनेचे उद्दिष्ट :  लसीकरणामुळे येणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी करणे.  प्रयेक लाभार्थीस योग्य वेळी देय लसीचा डोस देणे.  बालमृत्यु प्रमाण कमी करणे.  लसीकरणाने संबंधित रोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्य वेळ, योग्य अंतराने व नियमितपने लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी खालीप्रमाणे अनुदान देण्यात येते. • मोबीलीटी सपोर्ट – प्रत्येक आरोग्य सेवा सत्राकरीता व्हॅक्सीन कॅरीयर, एडी सिरींज व इतर साहित्याची वाहतुक करणेकरिता रु. ५०/- अनुदान मंजुर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वाहन नाही अशा ठिकाणी सत्रात उपस्थित राहणाऱ्या आरोग्य सहाय्यक यांस रु. ५०/- रोखीने देय राहतील. • सहाय्यक गट – मुख्यालय सोडून कार्यक्षेत्रात आरोग्य सेवा सत्राचे ठिकाणी सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे गटाला चहापाण्यासाठी रु. १५०/- अनुदान मंजुर आहे.
21 आरोग्य विभाग रुग्ण कल्याण समिती म्हणजे काय ?राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सेवांच्या दक्ष व्यवस्थापनासाठी रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. रुग्ण कल्याण समिती ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केलेली संस्था असावी लागते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्ह्या रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी रुग्ण कल्याण समितीच्या स्थापना करण्यात आलेली आहे. सदर समित्यांना प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये रुग्ण कल्याण समिती निधी म्हणून रु. १०००००/- अनुदान अनुज्ञेय आहे. उद्दिष्टे :  राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणीवर संनियंत्रण.  विविध आरोग्य सेवांचे नियंत्रण  रुग्णालयीन सेवेची गुणवत्ता राखणे.  रुग्णालयीन सेवांबाबत लोकांचे प्रतिसाद घेणे.  स्थानिक देणगी दारांचा सहभाग वाढवणे.  प्राप्त होणाऱ्या निधींचा रुग्ण सेवा दर्जा वाढविण्याकरिता उपयोग करणे.
22 आरोग्य विभाग ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती म्हणजे काय ?मुलभुत आरोग्य सुविधामध्ये सुधारणा करण्याबरोबरच परिसर स्वच्छता, पोषण व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याबाबींकडेही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांमध्ये लक्ष दिले जाते. यासाठी ग्रामस्तरावरील ग्राम आरोग्य समिती व ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांचे विलीनीकरण करून या विषयासाठी एकच समिती ग्राम आरोग्य व पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गठीत करावयाची आहे. याबाबतचे शासनाचे आदेश, समितीच्या कार्यकक्षा, कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचे परिपत्रक ग्रामस्तरावर देण्यात आलेले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समित्या गठीत झालेल्या आहेत. ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गठीत करण्यात आल्यावर या समितीचे सध्या असलेले बँक खाते फ़क़्त पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रमासाठी वापरात ठेवावे, तर आरोग्य महिला व बाल विकास कार्यक्रमासाठी स्वतंत्र बचत बँक खाते उघडण्यात यावे. हे स्वतंत्र बचत खाते बँक खाते समितीचे अध्यक्ष व गावातील अंगणवाडी सेविका या दोघाच्या संयुक़्त सहीने चालविण्यात यावे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांअंतर्गत आरोग्य तसेच पोषण कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त होणारा निधी या स्वतंत्र बचत खात्यामध्ये जमा करण्यात यावा. या खात्यामधील जमा खर्चाची नोंद आशा / अंगणवाडी सेविका यांनी स्वतंत्र नोंदवही द्वारे ठेवावी. जमाखर्चाची ही नोंदवही वेळोवेळी ए.एन. एम. / एम. पी. डब्ल्यु / ग्रामपंचायतीने तपासावी व सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध ठेवावी. या निधीचा विनियोग करण्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेल्या / येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करणेत यावी. सदर योजनेसाठी प्रत्येक महसुली गावाला दरवर्षी रु. १००००/- प्रमाणे अनुदान उपलब्ध होत आहे.
23 आरोग्य विभाग आयपीएचएस म्हणजे काय ?सर्व सरकारी आरोग्य केंद्राच्या सेवांच्या दर्जा हा आयपीएचएस अभियानाच्या काळातच गाठला जावा हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे ध्येय आहे. या प्रक्रियेत प्रथम संदर्भ केंद्राइतकी सक्षम सेवा देणारे युनिट म्हणून प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला विकसित केले जाणार आहे. ज्यामध्ये जोखमीच्या बाळंतपणासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध असतील. ग्रामीण रुग्णालयामधील कोणत्या सेवा निश्चितपाने मिळतील व त्यासाठी कोणत्या किमान बाबी तिथे असतील हे आयपीएचएस मध्ये ठरले. या किमान बाबी खालीलप्रमाणे.  किमान वैद्यकीय व सहाय्यक मनुष्यबळ  आवश्यक साधने  औषधांची उपलब्धता  मुलभूत भौतिक सुविधा  जनआरोग्य हक्कांची सनद  दर्जा नियंत्रणासाठी आवश्यक गरांजाची पुर्तता  आरोग्य सेवांचे दर्जा निश्चित करणे त्यासाठी स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल उपचार प्रक्रियेची प्रमाणित प्रणाली.
24 आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना म्हणजे काय ?केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जननी सुरक्षा योजना एप्रिल २००५ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेचे उद्दिष्ट :  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ( मुख्यतः चाळी, झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती इ.) दारिद्र्यरेषेखालील व अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण वाढवणे.  मातामृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण कमी करणे.  प्रसुतीपुर्व तपासण्या, नवजात बालकांची देखभाल, प्रसुतीपश्यात सेवा तसेच सुयोग्य संदर्भ सेवा व वाहनव्यवस्थेची तरतुद या सेवांची जोड देऊन प्रसुती सेवांचे दर्जा सुधारणे. लाभार्थी पात्रता :  सदर लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील अथवा अनुसुचित जाती, जमातीचा असावा.  १२ आठवड्याच्या आत गरोदरपणाची नोंदणी होणे आवश्यक.  सदर योजनेचा लाभ प्रसुतीनंतर तात्काळ देण्यात येतो.  गरोदर मातेने प्रसुतीपूर्व सर्व सेवा घेणे आवश्यक आहे. मिळणारा लाभ :  ग्रामीण भागाकरीता बाळंतपण शासकीय ग्रामीण आरोग्य संस्थेत झाल्यास ७००/- रुपये अनुदान देय राहील.  शहरी भागाकरीता बाळंतपण शासकीय ग्रामीण आरोग्य संस्थेत झाल्यास ६००/- रुपये अनुदान देय राहील.  महिलेच्या गरोदर पणातील किंवा प्रसुती काळातील जोखमीमुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करावयाचे झाल्यास व त्यासाठी शासकीय रुग्णालयात तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध नसल्यास खाजगी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांची सेवा देण्यासाठी १५००/- रुपये मानधन किंवा शस्त्रक्रिया खाजगी मानांकित रुग्णालयात झाल्यास रु. १५००/- अनुदान खाजगी रुग्णालयास देय राहील.
25 आरोग्य विभाग पायाभुत सुविधा विकास कक्ष म्हणजे काय ?राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पायाभुत सुविधा विकास कक्ष स्थापन करणेबाबत शासन परिपत्रक, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन परिपत्रक क्र.एनआरएचएम१००७/ प्रक्र९/ आरोग्य ७ मंत्रालय सार्वजनिक आरोग्याशी निगडीत विविध घटकांच्या संदर्भात केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे. सर्व स्तरावरील आरोग्य केंद्राचे बांधकाम, सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये सुधारणे इ. बाबींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत नविन उपकेंद्राच्या बांधकामामध्ये डिलीव्हरी रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे जेणेकरून उपकेंद्र ठिकाणी डिलिव्हरीची व्यवस्था झाल्याने स्थानिक लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.
26 आरोग्य विभाग राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे काय ?या कार्यक्रमाअंतर्गत ० ते ०६ या वयोगटातील अंगणवाडी बालकांची तपासणी वर्षातुन दोनदा व ६ ते १८ या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची तपासणी वर्षातुन एकदा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकाकडून प्रत्यक्ष शाळेत जाऊन मुलांची तपासणी करण्यात येते. तसेच या तपासणी अंती गंभीर व दुर्धर आजारी मुलांवर पुढील उपचार व शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय व शासनाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये करण्यात येतात. सदर कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने संयुक़्तरित्या जिल्ह्यात राबविण्यात येतो.
27 आरोग्य विभाग उपकेंद्र बळकटीकरण म्हणजे काय ?राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रत्येक उपकेंद्रास दरवर्षी १०,०००/- रुपयांचे अनुदान दिले जाते. प्रत्येक उपकेंद्राच्या मुख्यालयी असलेल्या बँकेत ( प्राधान्याने राष्ट्रीयकृत बँक ) अथवा पोस्टात ए. एन. एम. व स्थानिक सरपंच यांच्या नावाने संयुक्त खाते उघडून त्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. सदरचे अनुदान हे केवळ जनतेच्या आरोग्य सुविधात वाढ करण्यासाठी खर्च करावयाचे आहे. परंतु अतिजोखमीच्या लाभार्थीला संदर्भ सेवेसाठी लागणारा खर्च सोडून इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी खर्च करता येईल. या अनुदानातुन खालील बाबींसाठी खर्च करता येईल.  स्थानिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक बाबी.  उपकेंद्र इमारतीसाठी तातडीच्या किरकोळ दुरुस्त्या उदा. नळ दुरुस्ती, किरकोळ म्हणजे रु. १०००/- पर्यंत छप्पर दुरुस्ती.  अतिजोखमीच्या व्यक्तीना तातडीच्या वेळी संदर्भ सेवा देण्यासाठी.  रुग्णांच्या सोयीसाठी सतरंजी, खुर्च्या , टेबल, बाकडे इत्यादी.  उपकेंद्राच्या इमारतीच्या सभोवताली तसेच आसपास स्वच्छता राखण्यासाठी याकरीता खर्च करता येईल.
28 आरोग्य विभाग अंबध निधी व देखभाल दुरुस्ती निधी म्हणजे काय ?राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत सर्व प्रा.आ.केंद्र पुर्णपणे कार्यरत करणेसाठी प्रतिवर्षी रु. २५०००/- प्रत्येकी प्रा.आ.केंद्राना अंबध निधीमधुन देण्यात येणार असुन, प्रा.आ.केंद्राच्या किरकोळ दुरुस्तीसाठी प्रतिवर्षी रु. ५००००/- प्रत्येकी देण्यात येत आहे. अंबध निधी प्रामुख्याने रुग्णांना आरोग्य विषयक सेवा पुरविण्यासाठी खर्च करावयाचा आहे. ज्यामध्ये प्रा. आ. केंद्राना पडदे, विद्युत उपकरणे, बी.पी.अॅपरेट्स, डिलीव्हरी टेबल, स्टेथोस्कोप, मातांसाठी व बालकांसाठी वेईंग मशीन, तांबी इ. गोष्टी खरेदी करणेसाठी तसेच अतिताडीच्या रुग्णांना संदर्भीय सेवा देण्यासाठी, परिसर स्वच्छता देण्यासाठी तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी वरील निधी प्राप्त झालेला असुन प्रा. आ. केंद्राना वितरीत करण्यात येतो. सदर अंबध निधी व देखभाल दुरुस्ती निधी चा विनियोग रुग्ण कल्याण समितीच्या नियंत्रणाखाली करावयाचा आहे.
29 आरोग्य विभाग जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम म्हणजे काय ?या कार्यक्रमांअंतर्गत गरोदर माता व नवजात अर्भकांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जातात. जसे कि, गरोदर मातांना नोंदणीपासून ते प्रसुतीनंतर ४५ दिवसांपर्यंत सर्व आरोग्य सेवा मोफत पुरवल्या जातात. यामध्ये आरोग्य संस्थेतील सर्व औषधउपचार व तपासण्या व प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतर मोफत वाहतुक व्यवस्था मोफत करणेत येते. ही सोय १ वर्षापर्यंत नवजात अर्भकास देण्यात येते.
30 आरोग्य विभाग अर्श कार्यक्रमाअंतर्गत मैत्री क्लिनिक म्हणजे काय ?किशोरवयीन मुलांमुलींमध्ये होणारे विविध आजार तसेच वयात येताना होणारे भावनिक, शारीरिक व लैंगिक बदल व गैरसमजातून होणारे विविध आजार त्याचबरोबर किशोरवयीन मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात असणारा रक्तक्षय या सर्वांसाठी जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी मैत्री क्लिनिक स्थापन करून त्यांना समुपदेशन, वैद्यकीय सल्ला व औषधउपचार देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
31 आरोग्य विभाग टेलिमेडीसीन सेंटर म्हणजे काय ?या सेंटरमधून अतिगंभीर रुग्णांवर उपचार करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे, मुंबई या ठिकाणाच्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची संगणक प्रणालीद्वारे मदत घेण्यात येते. तसेच रुग्णांच्या सद्यस्थितीचा माहिती त्यांना संगणकाद्वारे पाठवून त्यांचा सल्ला घेऊन सुयोग्य येथे स्थापन करून कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
32 आरोग्य विभाग कुटुंब कल्याण कार्यक्रम म्हणजे काय ?या कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या लाभार्थ्याला सानुग्रह अनुदान देण्यात येते. ज्यामध्ये अनुसुचित जाती, जमाती व दारिद्र्यरेषेखालील स्त्री लाभार्थीस रु. ६५०/- चे अनुदान दिले जाते. व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थीस रु. २५०/- चे अनुदान दिले जाते. तसेच पुरुष नसबंदी करून घेणाऱ्या लाभार्थीस रु. ११००/- अनुदान दिले जाते. सदरचे अनुदान हे लाभार्थीस ज्या शासकीय संस्थेत शस्त्रक्रिया होते त्या आरोग्य संस्थेकडून देण्यात येते. सदरचे अनुदान हे ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया शिबिरे होतात त्या आरोग्य संस्थेमध्ये अनुदान वर्ग करणेत येते व त्याच संस्थेतुन लाभार्थींस देण्यात येते.
33 आरोग्य विभाग आयुष म्हणजे काय ?महाराष्ट्र राज्यामध्ये पारंपारिक चिकित्सा पद्धतींचा जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात स्विकार केला गेला आहे. दैनदिन व्यवहारामध्ये आजार टाळण्यासाठी व उपचारासाठी आयुष पद्धतीचा वापर केला जातो. शारिरीक व मानसिक आजार दुर ठेवण्यासाठी व वैयक़्तिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आयुष पद्धतींना पर्याय नाही हे सिध्द झाले आहे. आयुष पद्धतींना पुनर्जीवित करणेसाठी, त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे सर्व जिल्हा रुग्णालय व काही अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये आयुष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शासकीय अॅलोपॅथी रुग्णालयांमध्ये आयुष सुविधा उपलब्ध केली जाते. यामध्ये आयुर्वेदिक, निसर्गउपचार, होमिओपॅथिक, युनानी उपचार पद्धती, योगा, सिद्धा यांचा समावेश केला जातो. यासर्व उपचार पद्धतीचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी जिल्हा शासकीय रुग्णालय व काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत.
माहिती उपलब्ध नाही
माहिती उपलब्ध नाही
१. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभ १ ला
२. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभ २ रा
३. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभ ३ रा
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :