(०२०) २६१३४८०६         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.

 

पुणे जिल्हयांचे भौगोलिक क्षेत्र १५,६२,०५८ हेक्टर. एवढे असुन यापैकी लागवडी लायक क्षेत्र ११,५६,२०० हेक्टर (७४%) एवढे आहे. जिल्हयांचे हवामानाच्या दृष्टिने दोन भाग पउतात. पश्चिम भाग हा डोंगराळ असून तो अतिपावसाचा आहे. या भागात पावसाळयांत अतिप्रमाणांत पाऊस पडतो पण जानेवारी ते जून या काळांत या भागांत पाण्याची टंचाई जाणवेत. पूर्व भाग प्रामुख्याने पठारी प्रदेश आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तो प्रामुख्याने अवर्षण प्रवण आहे. या भागात लागवडीलायक क्षेत्र मोठया प्रमाणांत असल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी मोठया प्रमाणांत आहे. सिंचनाचे माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढविणेसाठी शासनामार्फत अनेक सिंचन योजनांची कामे हाती घेण्यांत येतात. सिंचन योजनांचे व्याप्तीनुसार शासनाने तीन विभाग सिंचन क्षेत्रात कामे करतात. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे -

जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागा मार्फत १०० हे पर्यन्त सिंचन क्षमतेच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश होता.

वरील पैकी 1 ते 3 योजना सामुहिक लाभाच्या आहेत तर अ.न.४ ची योजना वैयक्तिक लाभाची आहे.सर्व लघु पाटबंधारे योजना ५.00 द.ल.घ.फु.(१५० स.घ.मी.) पर्यन्त जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यांत येतात. प्रति द.ल.घ.फु. व्दारे अंदाजे ६ ते ७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

अं.क्र.योजनाकालावधीमाहिती 
1 पाझर तलाव व गावतलाव बांधणे0योजनेचा उददेश – वाहुन जाणारे पाणी मातीचा भराव टाकून अडविणे व त्यायोगे जमिनीत मुरवणे. त्यामुळे तलावाच्या खालील बाजुच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. काही तलावात सहा महिन्यांपेक्षा जास्त पाणी असलेने तलावात मासेमारी व्यवसायाव्दारे उत्पन्न व स्थानिक लोकांना रोजगार निर्मीती होते. पाझर तलावातील पाणी पाझरुन भुगर्भातील जलस्तर वाढण्यास मदत होते. त्यामुळे तलावाखालील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होते. पाझर तलावामुळे होणारे सिंचन हे अप्रत्यक्ष सिंचन असते. योजनेचे निकष – स्थानिक नाला असावा. त्याच्या वरील बाजूस साधारण बशीसारखी भूरचना असल्यास पाणीसाठा होतो. नाला फार मोठा नसावा. अन्यथा सांडव्याचा खर्च वाढून योजना मापदंडाच्या बाहेर जाते. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 162768/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 162768/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते. जि.प. स्थापनेपासून 31 मार्च 2022 अखेर एकूण 727 पाझर तलाव व गावतलाव पूर्ण झाले त्यामुळे 75636.33 सघमी पाणीसाठा निर्माण झाला असून 17680.71 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पहा
2 साठवण बंधारे योजनेचा उददेश – ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो 1.50 ते 3.00 मी उंची पर्यंत काँक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष – पाणी साठविल्यानंतर लाभ धारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधा-यातील पाणी अप्रत्यक्ष सिंचनाव्दारे घेता येईल; अशा ठिकाणी साठवण बंधारा प्रस्तावित केला जातो. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 138324/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 178810/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते. जिप स्थापनेपासून 31 मार्च 2022 अखेर एकूण 781 साठवण बंधारे पूर्ण झाले. त्यामुळे 29307.01 सघमी पाणीसाठा निर्माण झाला असून 7776.82 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पहा
3 वळण बंधारे योजनेचा उददेश – ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो 1.50 ते 3.00 मी उंची पर्यंत काँक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष – पाणी साठविल्यानंतर लाभ धारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधा-यातील पाणी केवळ पाटाव्दारे घेता येईल; अशा ठिकाणी वळण बंधारा प्रस्तावित केला जातो. पाणीसाठयानंतर लगतच्या शेतक-यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होते. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 159957/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 159957/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते. जिप स्थापनेपासून 31 मार्च 2022 अखेर एकूण 745 वळण बंधारे पूर्ण झाले. त्यामुळे 19143.99 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पहा
4 वैयक्तिक विहीरींची कामे 4 मी.व्यास / 15 मी.खोलीयाआकारमानाच्याविहीरीसाठी 3,27,770/-रुपयेपयंर्तअनुदानमिळूशकते. अ)लाभार्थीहाजॉबकार्डधारकअसलापाहिजे.तसेचत्यानेमजूरम्हणूनकामआवश्यक. ब)लाभार्थ्याचीनिवडग्रामसभेनेकरावयाचीआहे. क)विहीरीलामंजूरीदेतानाभूजलसर्वेक्षणविकासयंत्रणेकडूनपाणीउपलब्धतेचेप्रमाणपत्रघेणेआवश्यकआहे. ड)लाभार्थ्याचीसंख्याजास्तअसल्याससर्वलाभार्थ्यांनीलाभदेणेशक्यनसल्यासखालीलप्रमाणेप्राधान्यक्रमठरवावा. 1) दारिद्रयरेषेखालीलअनुसूचितजमाती / अनुसूचितजातीच्याव्यक्ती. 2) अनुसूचितजमाती / अनुसूचितजाती. 3) दारिद्रयरेषेखालीलकोणत्याहीप्रवर्गातीलव्यक्ती. 4) अल्पभुधारकवसिमंातशेतकरी 5) भुसुधारक योजनेचे लाभधारक पहा
5 स्वच्छतागृहे म ग्रा रो ह यो अंतर्गत करणेत येणा-या कामांमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता गृहे बांधकाम अ)वैयक्तिकस्वच्छतागृहे - अकुशल 6 मनुष्यदिवसवकुशल 2 मनुष्यदिवस. ब) सार्वजनिक शैचालये पहा
6 वृक्ष लागवड अ)गायरान, गावठाण, शासकीय, निमशासकीय, सामूहिक व शैक्षणिक संस्थाच्या जमिनीवर वृक्ष लागवड. ब)ग्रामपंचायत हद्दीतील तुटक / विखुरलेली जमिन आणि रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड. वृक्षलागवडीत पूर्वपावसाळी / लागवडपूर्व कामे, प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाची कामेयासाठी तरतूद उपलब्ध आहे. पहा
7 विहिर /गाव तलाव/ पाझर तलाव/ पारंपारिक पाणीसाठी तलावातील गाळ काढणे यामध्ये पाणी साठयाचे खालील प्रकार अनुज्ञेय आहेत. 1) सर्वतलाव (लघुपाटबंधारे / पाझ्ररतलाव / पारंपारिकतलाव). 2) सर्वबंधारे. (यामध्येपिण्याच्यापाण्याच्याविहीरीलाप्राधान्यदयावे.) जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीयांच्या मालकीची तसेच खाजगी मालकीच्या विहीरीतील गाळ काढण्यास अनुमती आहे. एकाच हंगामामध्ये पावसाळा सुरु होणे पूर्वी गाळ काढणेचा आहे. गाळ काढणेचे कामपूर्णत: अकुशलस्वरुपाचे असून अंदाजपत्रकात कोणत्याही कुशल कामाचा समावेश करु नये. पहा
8 पाणंद/ शेत/ वनक्षेत्रातील /गावांतर्गत रस्ते 2001 ते 2011 साठीच्या रस्त्यच्या नियोजनात समाविष्ट नसलेली कामे देखील घेता येतात. फक्त मजूरी या योजनेखाली आणि साधनसामुग्री अन्य योजनेतून खर्च करण्याचा पर्याय उपलब्ध आहे पहा
9 ग्रामपंचायत भवन ग्रामपंचायत भवनसाठी19,18,504रुपये व तालुकापंचायत भवनसाठी 25 लक्ष रुपये केंद्र शासनाने निधी निर्धारित केला आहे. पहा
10 भू सुधारची कामे म गां रा ग्रा रो ह योजनेतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर भूसुधारची कामे घेता येतात. तसेच स्वत:च्या शेतात काम करणेस उत्सुक असलेल्या शेतक-यांना भूसुधारणेची कामे करता येतात. पहा
11 फळबाग लागवड यायोजनेंतर्गतवैयक्तिकलाभार्थ्यांच्याशेतावरग्रामपंचायतीअंतर्गतफळबागलागवडकरणेतयेते.अ)फळबागलागवडकेलेल्यास्वत:च्याक्षेत्रातफळबागलागवडीचेसंवर्धनवजोपासनाकरणेचीजबाबदारीलाभार्थ्यांचीराहील. ब)पीकनिहायमापदंडानुसारदुस-यावतिस-यावर्षातीलजिवंतझाडांच्याटक्केवारीप्रमाणेकामेकरणेचीजबाबदारीलाभार्थ्यांचीराहील. पहा
12 रोप वनसंरक्षण मग्रारोहयोअंतर्गतग्रामपंचायतीमार्फतरोपवनसंरक्षणवसंगोपनकरतायेते.त्यामध्येग्रा.पं.च्याताब्यातीलशासकीयजमीनीवरपहिल्यावर्षीकेलेल्यारोपवनातीलएकूणलागवडीमधील 200 रोपांचाएकघटकयाप्रमाणेरोपांचीसंख्याकमीजास्तकरुनसंगोपनकरतायेते. 200 रोपेसांभाळल्यासप्रचलितदैनंदिनमजूरीदर (रु. 238/- प्रतिदिन)मिळतो.यामध्येप्रामुख्यानेवयोवृध्द, विधवा, शारीरीकदृष्टयाकमजोर, भूमिहिनइ.कुटुंबांनाप्राधान्यदेणेतयेते. पहा
13 खतनिर्मिती नॅडिपखतनिर्मितीसाठीखड्डा (टाकी) :-वैयक्तिकस्वरुपाचेकामरुपये गांडूळखतनिर्मितीसाठीखड्डा :- वैयक्तिकस्वरुपाचेकामरुपये संजिवकेकिंवाअमृतपाण्यासाठीखड्डा :- वैयक्तिकस्वरुपाचे पहा
14 मत्स्यपालन सार्वजनिकठिकाणी (हंगामी)मत्स्यपालनकरणे :- सार्वजनिकस्वरुपाचे समुद्रकिनाऱ्यावरसार्वजनिकठिकाणीमासेसुकविण्याकरीताकाँक्रिटचाओटाबांधणे:-सार्वजनिकस्वरुपाचे पहा
15 जल व घनकचरा व्यवस्थापन अ)समुद्रावरभरती - ओहोटीचेपाणीअडवण्यासाठीबांधावयाचेकट्टे. ब)शोषखड्डा :- सार्वजनिक / वैयक्तिकस्वरुपाचे क)पुनर्भरणखड्डा :- सार्वजनिक / वैयक्तिकस्वरुपाचे पहा
16 पशुसंवर्धनाची कामे कुक्कुटपालनासाठीशेड :- 100 पक्षांसाठी शेळयांचागोठा :- 10 शेळयांसाठी जनावरांसाठीपक्क्याबांधकामाचागोठा (ओृटा), गव्हाणवमुत्रनिस्सारणासाठीटँक (टाकी) (6 जनावरांकरीता) अझोलासाठीखड्डा :- एकअझोलाचरतयारकरणे पहा
17 शेततळे अ.राज्यरोहयोअंतर्गतदि. 01.01.2010 रोजीच्याशासननिर्णयान्वयेअनुदानपध्दतीने 15 X 15 X 3 ते 30 X 30 X 3 याआकारमानाचीशेततळीबांधणेसमंजूरीदेणेतआलीआहे.तथापिमग्रारोहयोअंतर्गतलाभार्थीछोटेअसलेने 15x15x3 पेक्षाकमीआकाराचीशेततळीघेणेसपरवानगीदेणेतआलीआहे.तसेचस्थानिकपरिस्थितीचाविचारकरुनलांबी, रुंदीवखोलीबाबतआवश्यकतेनुसारबदलकरणेतयेतो.शेततळयांबरोबरचअन्यतत्समकामेफडसिंचन, शेतखडडेकिंवाजलकुंभइ.घेतायेते.स्थानिकपरिस्थितीनुसारशेततळयांचातळाशीउच्चदर्जाचेप्लॅस्टिकचेआच्छादनवापरतायेते. शेततळयाचाआकारशेतक-यांच्यासहमतीनेनिश्चितकरणेतकरावयाचेआहे. ब)बांध :- अ)समपातळीचर :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ब)समपातळीबांध :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम क)दगडीबांध :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ड)शेतबांध :-वैयक्तिकस्वरुपाचेकाम इ)गॅबियनबंधारा (जाळीचाबंधारा):-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ई)भूमिगतबंधारा :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम उ)मातीनालबांध (मातीचेबांध) :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ऊ)सिमेंटनालाबांध पहा
18 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे योजनेचा उददेश – ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो 1.50 ते 3.00 मी उंची पर्यंत काँक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष – ज्या ठिकाणी बंधा-यातील पाणी साठविल्यानंतर लाभ धारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधा-यातील साठलेले पाणी पाटाव्दारे किंवा ग्रॉव्हिटी व्दारे घेता येत नाही अशा ठिकाणी को.प.बंधारे घेऊन त्याव्दारे उपसासिंचनाचे माध्यमातुन पाणी उचलून क्षेत्र ओलिताखाली आणले जाते. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 138324/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 178810/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते. जिप स्थापनेपासून 31 मार्च 2022 अखेर एकूण 378 को.प.बंधारे पूर्ण झाले पूर्ण झाले. त्यामुळे 36544.46 सघमी पाणीसाठा निर्माण झाला असून 13534.49 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 5 शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी उपससिंचन योजना - उपसा सिंचन योजनेमध्ये खालच्या पातळीवरील पाणी पंपाच्या सहाय्याने वरच्या पातळीवर उचलले जाते. तलाव व कालव्यांची निर्मिती यांमुळे तलाव पातळीपेक्षा खालची पातळी असलेले मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र ओलीताखाली आणणे शक्य होते. परंतु वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणे पाण्याच्या कमतरतेमुळे शक्य झालेले नाही, म्हणून वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणेकरिता उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. उपसा सिंचन योजनेकरिता भूसंपादनाबाबतच्या समस्यांचे प्रमाण कमी आहे. पाण्याचा अपव्यय कमीत कमी होतो. शेतकऱ्यांसाठी मुख्य दाब नलिका, वितरण व्यवस्था याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविणे व प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देणे शक्य झाले आहे. उपसा सिंचन योजनेसाठी पाणी वापर संस्था व पाणी मंजूर असल्याचा पाणी परवाना आवश्यक आहे. पहा
19 पाझर तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढणे योजनेचा उद्देश 1 पावसाचे पाणी अडविणे – भूपृष्ठीय पाणी साठवण Surface water storage व भूजल पुनर्भरण करणे. 2 भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करणे – गाळ काढल्यामुळे उपलब्ध होणा-या पाणीसाठयामुळे पुनर्भरणासाठी अतिरिक्त पाणी व अवधी Retention period मिळाल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ करणे. पर्यायाने त्या परिसरात मान्सूनोत्तर काळात अधिक कालावधीपर्यंत भूजल उपलब्ध करणे. 3 नाला पात्रामध्ये गाळ साचलेने नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते व पुरस्थितीत प्रवाहाचे पाणी मुळ नाला पात्राबाहेरील भागात पसरुन लगतच्या शेतातील मातीचा सुपीक थर वाहुन जातो. गाळ काढून या समस्येचे निराकरण करणे. 4 गावांमधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे. 5 अशा ल.पा. योजना पुनर्जिवित करून त्या परिसरात नव्याने बंधारे बांधणेचा खर्च वाचविणे. 6 ग्रामीण भागातील लोकांचे उदर्निर्वाह मध्ये परिवर्तन घडवून आणणे. योजनेची कार्यपध्दती :- 0 ते 100 हे. सिंचनक्षमता असलेल्या पाझर तलाव/गावतलाव /को.प./साठवण/ वळण बंधारा यातील गाळ काढणे प्रक्रिया ही लोकसहभाग, सीएसआर, एनजिओ मार्फत करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. गाळ काढणे साठी कुठलाही शासकिय निधी उपलब्ध नाही. दरवर्षी पावसाळयामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर मोठया प्रमाणावर गाळ वाहुन येवुन ल.पा. योजनांमध्ये जमा होत असतो. पावसाळयामध्ये दरवर्षी गाळाचे थर तलावात साचत जातात. त्यामुळे पाझर तलाव /गावतलाव /को.प. /साठवण / वळण बंधारा यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. पर्यायाने सिंचनक्षमता खालावली जाते. नाला पात्रामध्ये गाळ साचलेने नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते व पुरस्थितीत प्रवाहाचे पाणी मुळ नाला पात्राबाहेरील भागात पसरुन लगतच्या शेतातील मातीचा सुपीक थर वाहुन जातो. अशा गाळ साचलेल्या ल.पा. योजनांमधील गाळ काढल्यास भूपृष्ठीय पाणी साठवण क्षमता Surface water storage व भूजल पुनर्भरण होवून सिंचन क्षमता पुनर्स्थापित व वाढ Rejuvenation and augmentation होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते. सदर योजनेतून लोकसहभागातून गाळ काढणेत येऊन शेतकऱ्याच्या शेतात पसरविला जातो. पहा
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 छोटे पाटबंधारे विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदयाचे उदिद्ष्ट काय?ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्तीला प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 100 दिवस काम मिळण्याची हमी असणे
2 छोटे पाटबंधारे विभागया कायादयानुसार रोजगारासाठी कोण अर्ज करू शकते?कोणत्याही गावातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्ती (18वर्षावरील)तसेच या योजनेतंर्गत किमान 1/3 महिलांची नोंदणी करणे आवश्यक असते.
3 छोटे पाटबंधारे विभागनोंदणीचे अर्ज कोणाकडे सादर करायचे असते.सादर अर्ज ग्रामपंचायत किंवा तालुका पंचायत समितीमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
4 छोटे पाटबंधारे विभागकामासाठी अर्ज केल्यानंतर त्याची पोच पावती अर्जदारा ला मिळू शकते का?होय. ग्रामपंचातीकडून तशी पोच पावती तारखेसह अर्जदाराला देणे आवश्यक आहे.
5 छोटे पाटबंधारे विभागजॉबकार्ड म्हणजे काय?या योजनेतंर्गत प्रत्येक लाभार्थीला रोजगाराची हमी मिळण्यासाठी आवश्यक असलेला मुळ कायदेशीर दस्तऐवज म्हणजे जॉबकार्ड होय.
6 छोटे पाटबंधारे विभागजॉबकार्ड मिळाले म्हणजे रोजगार मिळेल असे आहे का?नाही. रोजगार मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीला अर्ज करणे आवश्यक आहे.
माहिती उपलब्ध नाही